रामराजे नाईक निंबाळकर यांना होम ग्राऊंडवर हादरा; फलटण नगरपरिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

BJP Victory In Phaltan Municipal Council Election: फलटण नगरपरिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपला झेंडा फडकावला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या होम ग्राऊंडवर त्यांच्या मुलाचा दारुण पराभव झाल्याने साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
BJP leaders celebrate after Shamsher Singh Nimbalkar’s victory in the Phaltan Municipal Council elections.
BJP leaders celebrate after Shamsher Singh Nimbalkar’s victory in the Phaltan Municipal Council elections.Saam Tv
Published On

राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकाचा निकाल आता स्पष्ट झाला असून अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधु समशेरसिंह हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते. तर त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे शिंदेसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उभे ठाकले होते.

BJP leaders celebrate after Shamsher Singh Nimbalkar’s victory in the Phaltan Municipal Council elections.
Municipal Council Nagar Panchayat Election Result: उत्तर महाराष्ट्रात भाजपला जोरदार झटका; जाणून घ्या संपूर्ण नगरपालिका आणि नगरपरिषदांचा निकाल

या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र यामध्ये रामराजे निबाळकर यांच्या मुलाचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहे.

BJP leaders celebrate after Shamsher Singh Nimbalkar’s victory in the Phaltan Municipal Council elections.
साम टीव्हीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा; राज्यात महायुतीचा बोलबाला, जाणून घ्या संपूर्ण निकाल

वाई, सातारा

वाई नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी भाजप उमेदवार अनिल सावंत विजयी झाले आहेत. रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाप वैशाली निलेश माने विजयी झाल्या आहेत. सातारा मलकापूर नगरपालिकामधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार अनिल सावंत विजयी झाले आहेत. राहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजयी झाल्या आहेत. सातारा मलकापूर नगरपालिकामधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनवले विजयी झाले आहेत. मेढा नगरपंचायत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वरखेडे विजयी झाल्या आहेत.

BJP leaders celebrate after Shamsher Singh Nimbalkar’s victory in the Phaltan Municipal Council elections.
Nashik : नाशिकच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा दबदबा! भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं? वाचा

पाचगणी, सातारा

पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत. या निकालाची फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवला आहे. महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com