

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल समोर
साम टीव्हीने घेतलेला एक्झिट पोल ठरला तंतोतत खरा
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा डंका
महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर भाजपनंतर शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाचाही डंका पाहायला मिळाला. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्ही मराठीने एक्झिट पोल घेतला होता. या एक्झिट पोलची आकडेवारी तंतोतंत खरी ठरली आहे.
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान पार पडलं. २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात, तर २० डिसेंबर रोजी दुसर्या टप्प्यात मतदान पार पडले होते. त्यानंतर आज रविवारी २१ डिसेंबर रोजी २८८ नगरपरिषद आणि पंचायतीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीतून कुणाची सत्ता येणार? नगराध्यक्ष कोण होणार? याविषयीचा कल महा एक्झिट पोलमधून जाणून घेतला होता. साम टीव्हीने जाणून घेतला होता.
साम टीव्हीने महा एक्झिट पोल घेतला होता. पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर आणि कोल्हापूरपासून जळगाव आणि वर्धासह राज्यभरात कोणत्या पालिकेवर कोणाची सत्ता? कोण होणार नगराध्यक्ष? हे जाणून घेतलं होतं. या एक्झिट पोलमधून २८८ संभाव्य नगराध्यक्षांची यादी जाहीर केली होती.
तसेच संबंधित नगरपरिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल, असा अंदाज सामच्या महा एक्झिट पोलमध्ये वर्तवला होता. आजच्या निकालाने साम टीव्हीने घेतलेल्या एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरल्याचे आकडेवारीतून समोर आलं आहे.
आजच्या निकालानुसार, भाजपचे एकूण १२० नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. त्यामुळे आम्ही दिलेली भाजपविषयीची आकडेवारी तंतोतत खरी ठरली. शिंदे सेना नगराध्यक्षपदाच्या एकूण ४२ जागा जिंकणार असल्याचे एक्झिट पोलमधून सांगितले होते. त्यानंतर आज शिंदे गटाचे ६० नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आम्ही शिंदे गटाचे ४२ नगराध्यक्ष निवडून येतील असे सांगितले होते.
अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून येतील, असे सांगितले होते. त्यानंतर अजित पवार गटाचे ३७ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आम्ही सांगितलेली आकडेवारी खरी ठरल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शहर विकास आघाडी १० जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज शहर विकास आघाडीचे १३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.