पालघरमध्ये शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; एकनाथ शिंदेंनी दोन नगरपरिषदांवर भगवा फडकावला

palghar politics : पालघरमध्ये शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिलाय. पालघरमधील दोन नगरपरिषदांवर भगवा झेंडा फडकावला आहे.
Palghar political news
palghar newsSaam tv
Published On
Summary

पालघरमध्ये शिंदे गटाचा भाजपला दणका

पालघर आणि डहाणू नगरपरिषदांवर भगवा झेंडा फडकला

शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत आणि राजेंद्र माच्छी विजयी

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू या दोन नगरपरिषदांवर भाजपला शिवसेना शिंदे गटाने जोरदार दणका दिलाय. पालघर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत हे जवळपास 4000 मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांचा दारुण पराभव केलाय.

दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डहाणू नगर परिषदेत देखील शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारलीये. डहाणू नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी 3325 इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराभव केला आहे.

पालघर जिल्ह्यात भाजपकडून मंत्री गणेश नाईक , खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Palghar political news
पुण्यातील माळेगावात अजित पवार गटाला मोठा धक्का; तब्बल 5 अपक्ष उमेदवार विजयी

पालघर नगरपरिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तरी शिवसेना पक्ष फुटीनंतर हा बालेकिल्ला भाजपने आपल्याकडे खेचण्यास डावपेच सुरू केले होते. मात्र शिवसेना शिंदे गटाने भाजपचा हा डाव उधळून लावला आहे. नगराध्यक्ष पदांसह 30 नगरसेवक पदांपैकी तब्बल 19 नगरसेवक निवडून आणत पालघर नगर परिषदेत आपला भगवा शिवसेना शिंदे गटाने कायम ठेवलाय .

डहाणू नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक भाजप पेक्षा कमी निवडून आले असले तरी येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. डहाणू नगरपरिषदेत 27 जागांपैकी भाजपने आपले 17 नगरसेवक निवडून आणले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ तर शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत .

Palghar political news
Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

भाजपला एकाकी पडत शिवसेना शिंदे गटाने इतर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवला असून सर्व एकत्र आले तरी देखील आमचा विजय पक्का आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूत प्रचारादरम्यान व्यक्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com