पुण्यातील माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ५ अपक्ष उमेदवारांचा दणदणीत विजय
बारामतीत अजित पवार गटाला मोठा धक्का
माळेगावातील प्रभाग 9 मध्ये ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल
पुणे : बारामती तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा फटका बसला आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत ५ पाच अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधील माळेगावातच अजित पवार गटाला फटका बसल्याचे समोर आलं आहे.
काही महिन्यांपूर्वी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाने बाजी मारली. या माळेगाव साखर कारखान्याचे अजित पवार अध्यक्ष झाले. अजित पवारांनी थेट कारखान्याचे अध्यक्षपद भूषवल्याने माळेगाव चर्चेत आलं होतं. याच माळेगावात अपक्ष उमेदवारांच्या माळेगाव विकास आघाडीने ५ जागांवर विजय मिळवल्याची माहिती हाती आली आहे.
दिपाली अनिकेत बोबडे - अपक्ष
प्रभाग 3
रेश्मा सय्यद - महिला अपक्ष
प्रभाग 6
वैभव खंडाळे - अपक्ष
प्रभाग 7
पप्पू खरात - अपक्ष
प्रभाग 9
गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वरचिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.
पुण्यातील नगरपरिषदांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. बारामती, माळेगाव, जेजुरी, इंदापूर, दौंड, भोर , जुन्नर , शिरूरमध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सासवडमध्ये भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील इंदापूर नगरपरिषद अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात
पुण्यातील इंदापूर नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा अवघ्या 120 मतांनी विजयी झाले आहेत. प्रदीप गारटकर अवघ्या 120 मतांनी पराभूत झाले आहेत. यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का बसला आहे.
भोरमध्येही अजित पवारांची बाजी
पुण्यातील भोर नगपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारे 170 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवाने माजी आमदार संग्राम थोपटे यांना धक्का बसलाय. भोरमधील 20 पैकी नगरसेवकपदाचे राष्ट्रवादीचे 4 उमेदवार तर भाजपचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत.
बारामतीत अजित पवार गटाचा डंका
बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले. यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे, मनीषा समीर चव्हाण, जय नानासाहेब पाटील, प्रवीण दत्तू माने, रूपाली नवनाथ मलगुंडे, संपदा सुमित चौधरी आणि विष्णू तुळशीराम चौधरी हे विजयी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनुप्रिता तांबे बिनविरोध विजय झाल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.