

पंचांग
रविवार,२१ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष,
उत्तरायणारंभ.
तिथी-प्रतिपदा ०९|१२
रास- धनु
नक्षत्र-पूर्वाषाढा
योग-वृद्धियोग
करण-बवकरण
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - दिवस एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला आहे. यश म्हणजे काय असते हे आज जाणवेल. अनेकांकडून वाहवा मिळेल. काम करण्यासाठी नवी दिशा आणि नवे मार्ग आज सापडतील. भाग्यकारक घटना घडतील.
वृषभ - सर्व गोतावळ्यामध्ये आपण एकटेच आहोत ही भावना आज दाट होईल. कामे तर ढीगभर असतील पण चेव मात्र कणभरही नसेल. वाहने घातपात, अपघात यापासून स्वतःची काळजी घ्या.
मिथुन - "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर" असा काहीसा दिवस आहे. कितीही केले तरी संसारिक गोष्टी थांबत नाहीत. आज यामध्येच अधिक व्यस्तता जाणवेल. जोडीदाराकडे काही जबाबदाऱ्या दिल्या तर व्यवसाय, कामांमध्ये लक्ष घालू शकाल.
कर्क - मनाची उगाचच घालमेल होईल. घडून गेलेल्या गोष्टींविषयी अधिक खल आज नकोच. दिवसाची सुरुवात चांगली होईल पण शेवटी त्रस्तता असेल. आपल्याच लोकांकडून त्रासदाय घटना घडतील.
सिंह - पाठीचा कणा, हृदयाचे विकार या गोष्टींपासून आज स्वतःला जपावे लागेल. आज केलेली उपासना फलदायी होईल. शेअर्स मध्ये लॉटरीमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास धनवृद्धी होईल. दिवस चांगला आहे .
कन्या - जन्माला आलो आहोत तर जगून घ्यावे असे काहीशी भावना होईल. वाहनसौख्य, गृह सौख्य अर्थात याची खरेदी करणारा असाल तरी सुद्धा दिवस चांगला आहे. आईकडून विशेष चांगला बौद्धिक सल्ला आज मिळेल .
तूळ - भावंड सौख्य उत्तम आहे. आपल्या मागे अडचणीच्या वेळी खंबीर उभे राहणारे कोणीतरी आहे हे जाणवून मन स्वस्थ होईल. प्रेमाला नव्याने उभारी येईल. जवळचे प्रवास घडतील. दिवस चांगला आहे.
वृश्चिक - तिखट मसालेदार खाण्यापिण्याची आवड आज विशेष दाटेल. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. नकारात्मकतेला सकारात्मकतेची जोड देऊन कुटुंबीयांच्या बरोबर दिवस आनंदात जाईल.
धनु - "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" नुसत्याच कल्पनेची इमले बांधून कामे होत नसतात. आज कल्पनेच्या भराऱ्या घेण्यापेक्षा नियोजनामध्ये व्यस्त रहा. स्वतःसाठी दिवस स्वस्थ असेल. घेतलेल्या कामात यश मिळेल.
मकर - "सोबतीचा करार"अशी काही नाती असतात. या नात्यांमधून चांगले वाईट काही झाले तरी आपलेसे करावे लागते. जवळच्या लोकांकडून त्रासदायक अनुभव येतील. मनस्वास्थ्य खराब राहील. याचबरोबर पैशाची गळती चालूच राहील. काळजी घ्या.
कुंभ - सून जावई हे नाते अगदी दुधावरच्या साई सारखे नाते असते. आज आपल्याला यांच्याकडून विशेष स्नेह, माया मिळेल. ज्यामुळे दिवसाचे भारावलेपण असेल. जुन्या केलेल्या गुंतवणुकी मधून लाभही मिळतील.
मीन - जितके काम कराल तेवढी प्रगती होईल. असा दिवस आहे केलेल्या कामाचे सार्थक झाले आहे अशी जाणीव होईल. वरिष्ठ आणि कनिष्ठ त्याचबरोबर सहकारी यांचे आपल्याला योग्य सहकार्य मिळाल्यामुळे प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.