Ulhasnagar Crime: उल्हासनगरात प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर हल्ला; लोखंडी कड्याने मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ulhasnagar Crime News: प्रेयसीच्या भावाला चुगली केल्याच्या रागातून प्रियकर मित्राने मित्राला कड्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरच्या सपना गार्डन शेजारी घडली.
Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crimegoogle
Published On

प्रेयसीच्या भावाला चुगली केल्याच्या रागातून प्रियकर मित्राने मित्राला कड्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरच्या सपना गार्डन शेजारी घडली. घटनेला १५ दिवस उलटूनही पोलीसांनी आरोपी विरोधात कारवाई केली नसल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. ही घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पवन खटीजा आणि रौनक शर्मा हे दोघेही महाविद्यालयीन मित्र आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये रौनकच्या प्रेयसीचा भाऊ देखील आहे. त्याला कोणीतरी रौनक आणि त्याच्या बहिणीच्या मैत्रीबाबत सांगितले. रौनक हा टपोरी असल्याने त्याने बहिणीला रौनकशी मैत्री तोडण्यास सांगितले. त्यामुळे प्रेयसीने रौनकशी बोलणे बंद केले.

Ulhasnagar Crime
Ulhasnagar: उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा, महिला रुग्णांना फरशीवरच गादी टाकून उपचार

ही चुगली पवनने केली असल्याच्या संशयातून रौनकने त्याला ६ डिसेंबरच्या रात्री सपना गार्डन येथे गाठून हातातील कड्याने बेदम मारहाण करीत चोप दिला. ह्या घटनेला १५ दिवस उलटूनही पोलीसांनी रौनक शर्मा विरोधात कडक कारवाई केली नसल्याचा आरोप पवन खटिजा याने केला आहे.

Ulhasnagar Crime
Bhopal Crime: ५२ किलो सोनं, १० कोटींची रोकड, जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये घबाड सापडलं

पवन म्हणाला की, ६ डिसेंबरच्या रात्री त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याचे नाव रौनक असे आहे. तो म्हणाला रौनक हा त्याचा कॉलेजचाच मित्र आहे. कॉलेजमध्ये तो आमचा मित्र होता. तो एका मुलीशी बोलायचा आणि त्या मुलीचा भाऊ देखील आमच्या ग्रुपमध्येच होता. तिच्या भावाला बाहेरुन कुठूनतरी कळाले की मी त्याच्या बहिणीसोबत बोलतो तर त्याने तिच्या बहिणीला थांबवले बोलला की हा टपोरी मुलगा आहे त्याच्याशी बोलू नकोस. असे करुन रौनकच्या मनात राग होता की या ४-५ मुलांना मारायचं आहे. त्यानी मला सपना गार्डनकडे बोलावून मारायला सुरुवात केली. ही घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Ulhasnagar Crime
Pune Crime : धक्कादायक! शरीरयष्टी वाढवण्यासाठी इंजेक्शनचा डोस, पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com