Ulhasnagar: उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा, महिला रुग्णांना फरशीवरच गादी टाकून उपचार

Ulhasnagar Government Hospital: रुग्णाची वाढती संख्या आणि रुग्णालयात असणारी सुविधा अपुरी पडत आहे. दरम्यान या रुग्णालयात महिला कक्ष ५-६ मध्ये ६० बेडची सुविधा आहे.
Ulhasnagar
Ulhasnagargoogle
Published On

उल्हासनगर शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात सोयीचा अभाव असल्याने महिला रूग्णांवर अक्षरशः फरशीवरच गादी टाकून उपचार घेण्याची वेळ आली आहे. मूलतः दोनशे बेडच हे हॉस्पिटल गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू असून आता वाढत्या लोकसंख्येनुसार हे हॉस्पिटल वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उल्हासनगरमधील एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय म्हणजे येथील मध्यवर्ती रुग्णालय. या रुग्णालयात उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा तसेच मुरबाड अशा ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे रुग्णाची वाढती संख्या आणि रुग्णालयात असणारी सुविधा अपुरी पडत आहे. दरम्यान या रुग्णालयात महिला कक्ष ५-६ मध्ये ६० बेडची सुविधा असून सध्या या वॉर्डमध्ये सद्यस्थितीत १२० महिला उपचार घेत आहेत.

Ulhasnagar
EPFO: पेन्शन अर्जासाठी अंतिम मुदत जवळ; पेन्शनसाठी ही शेवटची संधी, ३.१ लाख लोकांना होणार फायदा

मुळातच ६० बेड असल्याने उर्वरित महिलावर फरशीवर गादी टाकून उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय एकमेव शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू नागरिक मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. या रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून येथील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळेच वाढती लोकसंख्या आणि काळाची गरज पाहता आता हे रुग्णालय वाढवण्याची नितांत गरज आहे.

Ulhasnagar
Ladki Bahin Yojana: ६० किलो रांगोळीचा वापर करुन ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची अनोखी कलाकृती

याचा पाठपुरावा मनसेच्या वतीने सुरू असून लवकरच या रुग्णालयात पुरेसा डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका, स्टाफ उपलब्ध झाला नाही तर मनसे पद्धतीने आंदोलन करू असा इशारा मनसे शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना बेडची सुविधा नसल्याने चक्क जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ४३ महिलांना रुग्णालय प्रशासनाने जमिनीवर झोपवलं होतं.

Ulhasnagar
Maharashtra Weather: पुढील ५ दिवस तापमानात मोठा बदल, कुठे पाऊस, कुठे थंडी, वाचा हवामानाचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com