EPFO: पेन्शन अर्जासाठी अंतिम मुदत जवळ; पेन्शनसाठी ही शेवटची संधी, ३.१ लाख लोकांना होणार फायदा

Pension Deadline: EPFO सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उच्च निवृत्ती वेतनाशी संबंधित 3 लाख 10 हजार प्रलंबित अर्जांबाबत EPFO ​​ने पगार आणि इतर माहिती अपलोड करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे.
EPFO
EPFOyandex
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने उच्च पगारावर पेन्शनसाठी नियोक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आता नियोक्ते हे तपशील ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सबमिट करू शकतात. EPFO ​​ने नियोक्त्यांना १५ जानेवारी 2025 पर्यंत आवश्यक स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे, जेणेकरून उच्च निवृत्ती वेतनासाठीच्या अर्जांवर प्रक्रिया करता येईल.

EPFO ने आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे ४.६६ लाख प्रकरणांमध्ये अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टीकरण मागितले आहे. शिवाय, ३.१ लाखांहून अधिक अर्ज अजूनही नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत. २०२२ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात, १ सप्टेंबर २०१४ पर्यंत कर्मचारी पेन्शन योजनेच्या (EPS) विद्यमान सदस्यांना त्यांच्या पगाराच्या सुमारे ८.३३ टक्के पेन्शन म्हणून योगदान देण्याची परवानगी दिली होती.

EPFO
Maharashtra Weather: पुढील ५ दिवस तापमानात मोठा बदल, कुठे पाऊस, कुठे थंडी, वाचा हवामानाचा अंदाज

अशा प्रकारे, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ जुलै २०२३ पर्यंत होती आणि तोपर्यंत १७ लाख ४९ हजार पेन्शनधारक किंवा सदस्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. मंत्रालयाने सांगितले की, नियोक्ता संघटनांकडून वेतन तपशील अपलोड करण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती आली होती, ज्यावर आधी ३० सप्टेंबर २०२३, नंतर ३१ डिसेंबर २०२३ आणि नंतर ३१ मे २०२४ पर्यंत वेळ देण्यात आला होता.

EPFO
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'या' दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार

यावर्षी ऑक्टोबरमध्ये १७ लाख ८० हजार नवीन कामगार ईएसआय योजनेत सामील झाले आहेत, त्यापैकी २५ वर्षांपर्यंतच्या कामगारांची संख्या ८ लाख ५० हजार आहे. नव्याने सामील झालेल्या सदस्यांमध्ये ३ लाख ५२ हजार महिला आणि ४२ ट्रान्सजेंडर आहेत. ऑक्टोबरमध्ये २१५८८ नवीन संस्था देखील ESI योजनेत सामील झाल्या. मंत्रालयाने सांगितले की, यामुळे अधिक कामगारांना ESI चे सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील.

EPFO
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'या' दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com