
Ladki Bahin Yojana Updates: राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या लाभार्थींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या अंतर्गत, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये संक्रांतीआधी ३००० रुपये जमा होणार अशी माहिती समोर आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे पैसे संक्रांताआधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. आतापर्यंत, लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचे आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत.
आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी आर्जदारांचा आकडा २ कोटी ४७ लाखांपर्यंत आहे.
या योजनअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना गेल्या 5 महिन्यात 7500 रुपये तर मिळाले पण चार महिने झाले तरी अंगणवाडी सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. सरकारकडून त्यांना पैसे देण्यात आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यात साडेतीन हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.