Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी अपडेट, खोटी माहिती देत असाल तर सावधान...

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. अशातच यात मोठी अपडेट समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanagoogle
Published On

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला महिलांनी अर्थात लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. या लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने आतापर्यंत अर्थात ६ महिन्यांत सुमारे १७ हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

महाराष्ट्र सरकारने जूलैमध्ये लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. महायुती सरकारने या योजनेअंतर्गत २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेत २ कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र, यातील ३०-३५ लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहेत. या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. तर खोटी माहिती देऊन लाभ देणाऱ्या महिलांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! 'या' जिल्ह्यातील तब्बल १० हजार महिलांचे अर्ज बाद

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतील प्रलंबित अर्जांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना लाडली बहना योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे. लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून लाभ घेत असेल तर तिलाही लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टरला वगळण्यात आले आहे. ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना यापुढे लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Ladki Bahin Yojana
Nashik: आता ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! नाशिकमध्ये १९३ गावांत निवडणुका, कोण मारणार बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com