Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे कराल चेक, एका क्लिकवर पाहा

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात महायुती सरकारने जुलै २०२४ या महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ) सुरू केली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanayandex
Published On

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि महायुतीच्या मित्रपक्षांच्या एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर फडणवीस सरकारने ३३७७८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या, त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद आहे.

राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. ती लवकरच २१०० रुपये प्रति महिना केली जाईल. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनेच्या पाचव्या हप्त्याची आगाऊ रक्कम भरली होती. मात्र लाडक्या बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक कराल ते जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी अपडेट, खोटी माहिती देत असाल तर सावधान...

असे कराल चेक

Step 1: आपल्या स्मार्टफोनमध्ये नारी शक्ती दूत अ‍ॅप उघडा आणि लॉगिन करा.

Step 2: डॅशबोर्डमध्ये “लाभार्थी अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.

Step 3: त्यानंतर आपले गाव, ब्लॉक, तालुका, आणि जिल्हा निवडा आणि “शोधा” बटणावर क्लिक करा.

Step 4 : तुम्हाला तेथे दिसेल तुमचं नाव यादीत आहे की नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: दिल्लीतही राबवली लाडकी बहीण योजना, महिलांना २१०० नाही तर एवढे रुपये मिळणार

मागील अर्थसंकल्पात मागील शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना १५०० रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक ४६००० कोटी रुपयांची घोषणा केली होती. यासह २.५ कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. आता बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. ती लवकरच २१०० रुपये प्रति महिना केली जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! 'या' जिल्ह्यातील तब्बल १० हजार महिलांचे अर्ज बाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com