Ladki Bahin Yojana: दिल्लीतही राबवली लाडकी बहीण योजना, महिलांना २१०० नाही तर एवढे रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana Delhi: आता दिल्लीतही लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत आता दिल्लीमध्ये महिलांना पैसे वाढवून मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanayandex
Published On

महाराष्ट्राप्रमाणेच आता दिल्लीतही लाडकी बहीण योजना लागू होणार आहे. आम आदमी पार्टीचे संचालक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. दिल्लीतही आता सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये १००० रुपये जमा करणार आहे. ही योजना लागू झाली आहे. दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

आजपासून दिल्ली सरकारने हजार रुपये चालू केले आहे. पण निवडणुकीची १०-१५ दिवसात घोषणा होऊ शकतो. त्यामुळे आताच अकाऊंटमध्ये पैसे जमा होणं शक्य नाही आहे. पण योजना लागू झाली आहे. उद्यापासून जे रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे, ते २१०० रुपयांसाठी असेल असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी अपडेट, खोटी माहिती देत असाल तर सावधान...

काही लोक म्हणत होते की हे शक्य नाही. पण केजरीवाल जे ठरवतो, ते करुन दाखवतो. मला मग कोणी रोखू शकत नाही असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. मला माहिती आहे पैसे कुठून आणायचे ते पैसे कुठे वाचवायचे आणि कुठे खर्च करायचे. तुम्ही चिंता करु नका. मी म्हटलं महिन्याला हजार रुपये देईन तर दर महिन्याला हजार रुपये आजपासून सुरु केले आहेत असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! 'या' जिल्ह्यातील तब्बल १० हजार महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये धेण्यात येणार. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील ऐतिहास विजयाचं श्रेय हे लाडकी बहीण योजनेला दिले. निकालानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरुच राहणार असल्याचं जाहीर केलं. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मासिक १५०० रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवून आता २१०० रुपये करण्याचं महायुतीनं विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिलं होतं.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, अधिवेशनात वाढवी निधी मंजुरीनंतरच हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारनं २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी ४६००० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. नोव्हेंबरमध्ये २.३४ कोटी पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ७५०० रुपये (जुलै ते नोव्हेंबरसाठी) जमा केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com