Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; 'या' दिवसापासून रंगणार महोत्सव

Film Festival: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारिख आणि वेळापत्रकाची आयोजकांच्या वतीने घोषणा करण्यात आली आहे.
Film Festival
Film FestivalSaam tv
Published On

Film Festival: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सुचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल, कालिका स्टील व सॉलीटेअर टॉवर्स यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे.

Film Festival
Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

भारतीय सिनेमा स्पर्धा

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

Film Festival
Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी संयोजक, ऑस्कर पुरस्कार विजेते पद्मश्री रसूल पुकूट्टी (कोचीन) हे असणार आहेत. तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी (कोलकाता), ज्येष्ठ संकलक आरती बजाज (मुंबई), ज्येष्ठ छायाचित्रणकार राफे मेहमूद (मुंबई) व ज्येष्ठ पटकथा लेखक उर्मी जुवेकर (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत. फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट समीक्षक डॉ.सी.एस. व्यंकटीस्वरन (कोचीन) तर डॉ.मीनाक्षी दत्ता (दिब्रुगड) व एम.एम.व्हेट्टीकाड (नवी दिल्ली) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.

चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुक्कूट्टी यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मकदुम, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कालिका स्टीलचे अरूण अग्रवाल, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेला व सध्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत असलेली स्पॅनिश/फे्ंरच भाषेतील, ऑलिव्हर लॅक्से दिग्दर्शित चित्रपट सिराट महोत्सवाचा उद्घाटकीय चित्रपट म्हणून प्रदर्शित केला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com