Apple WWDC 2024 इव्हेंटची डेट झाली कन्फर्म, कंपनी करू शकते अनेक मोठ्या घोषणा

Apple WWDC 2024 Event: Apple WWDC 2024 इव्हेंटची डेट कंपनीने जाहीर केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपल्या नवीन AI फीचर्ससह अनेक महत्वाच्या घोषणा करू शकते.
Apple WWDC 2024 इव्हेंटची डेट झाली कन्फर्म, कंपनी करू शकते अनेक मोठ्या घोषणा
Apple WWDC 2024 EventSaam Tv

Apple WWDC 2024 लवकरच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात हा इव्हेंट सुरू होणार आहे. ॲपलने या कार्यक्रमाची तारीख आणि वेळ देखील जाहीर केली आहे. Apple WWDC 2024 इव्हेंटमध्ये कंपनीच्या नवीन सॉफ्टवेअर अपग्रेडचे तपशील दिले जातील.

Apple WWDC 2024 हा कंपनीच्या मोठ्या इव्हेंटपैकी एक असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या इव्हेंटमध्ये iOS अपडेटसोबत AI फीचर्सचीही घोषणा करू शकते. असं असलं तरी AI फीचर्सबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण कंपनी Apple AI फीचर आणू शकेल, अशी शक्यता वक्तव्य केली जात आहे. Apple WWDC 2024 इव्हेंटमध्ये काय खास असेल? हेच जाणून घेऊ...

Apple WWDC 2024 इव्हेंटची डेट झाली कन्फर्म, कंपनी करू शकते अनेक मोठ्या घोषणा
POCO M6 Plus 5G लवकरच होणार भारतात लॉन्च, LCD डिस्प्लेसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Apple चा हा इव्हेंट 10 जूनपासून सुरू होईल आणि 14 जून 2024 पर्यंत चालेल. हा इव्हेंट भारतात रात्री 10:30 वाजता सुरू होईल आणि तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह पाहू शकता. याचा मेन कार्यक्रम 10 जून रोजी सुरू होईल.

ॲपलच्या इव्हेंट पेजला भेट देऊनही तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. Apple WWDC 2024 इव्हेंट YouTube वर देखोल लाईव्ह केला जाणार आहे. कंपनीने हा इव्हेंट आपल्या वेबसाईटवरही लाईव्ह केला आहे.

Apple WWDC 2024 इव्हेंटची डेट झाली कन्फर्म, कंपनी करू शकते अनेक मोठ्या घोषणा
जबरदस्त फीचर्स आणि 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F55 5G लाँच; मिळतोय २ हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

Apple WWDC 2024 कीनोटमध्ये iOS 18, iPad 18, WatchOS अपडेट आणि macOS ची नवीन व्हर्जन्स सादर करण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी या इव्हेंटमध्ये AI संबंधित फीचर्स सादर करण्याची घोषणा देखील करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी GenAI च्या स्वतःच्या व्हर्जनवर काम करत आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी याबाबत काही अपडेट्स आणण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com