Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Choose Juicy and Sweet Apple : खराब सफरचंद असल्यास आपल्याला जास्त पस्तावा होतो. कारण जास्त पैसे खर्च केलेले असतात. आपले पैसे वाया गेले सफरचंद सुद्धा खाता नाही आला अशी चुरचूर मनाला लागते.
Choose Juicy and Sweet Apple
Perfect AppleSaam TV

शरीरात व्हिटॅमीन आणि कॅल्शिअम जास्त वाढावं यासाठी प्रत्येक व्यक्ती आहारात फळांचा समावेश करतात. त्यात सफरचंद म्हणजे जास्तीत जास्त व्हिटॅमीनचा खजीनाच आहे. सफरचंदचा भाव अन्य फळांच्या तुलनेत नेहमीच जास्त असतो. त्यामुळे व्यक्ती हे फळ घेताना त्याची कॉलीटी, टेस्ट अशा सर्वच गोष्टी निट तपासून पाहतात.

Choose Juicy and Sweet Apple
Benefits Of Apple: दररोज सफरचंद खाल्ल्याने शरीराला होतील फायदे...

सफरचंद खरेदी केल्यावर घरी जाऊन खाताना आतून तो खराब निघतो. खराब सफरचंद असल्यास आपल्याला जास्त पस्तावा होतो. कारण जास्त पैसे खर्च केलेले असतात. आपले पैसे वाया गेले सफरचंद सुद्धा खाता आले नाही अशी चुरचूर मनाला लागते. त्यामुळे आज परफेक्ट सफरचंद ओळखण्याच्या काही टिप्स जाणून घेऊ.

रंग

सफरचंद कायम त्याच्या रंगावरून खरेदी करावा. सफरचंदाचा रंग लाल असल्यास तो खरेदी करण्यासाठी सर्वजण आकर्षीत होतात. लाल सफरचंद चवीला देखील छान असेल असं सर्वांना वाटतं. मात्र तसं नसतं, लाल रंगाचा सफरचंद आंबट लागतो. तर पिवळ्या रंगाचा सफरचंद एकदम गोड लागतो. त्यामुळे शक्यतो पिवळ्या रंगाचा सफरचंद खाण्यासाठी निवडावा.

सफरचंद हातात घेऊन तापासा

बाजारात लाल, पिवळे आणि हिरवे असे तीन रंगाचे सफरचंद असतात. यातील सर्वच सफरचंद चवीला गोड नसतात. ज्या सफरचंदवर रेषा आणि बारीक ठिपके असतात तो सफरचंद गोड असतो. सफरचंदवरील बारीक ठिपके सहज डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही हातात घेऊन सफरचंद तपासल्यास त्यावरचे ठिपके आणि रेषा सहज दिसतील.

सुवासाने समजेल

प्रत्येक फळाचा स्वात:चा एक वेगळा सुवास असतो. पळ पिकलं की पटकन त्याचा वास येतो. जेव्हा तुम्ही सफरचंद खरेदी कराल तेव्हा त्याचा सुगंध घेऊन पाहा. सफरचंद कच्चा असेल किंवा आंबट असेल तर त्याचा सुवास देखील तसाच येतो. तर सफरचंद गोड असल्यास त्याचा सुवास देखील गोड येतो. या काही टिप्स फॉलो करून तुम्ही योग्य सफरचंद खरेदी करू शकता.

Choose Juicy and Sweet Apple
Upcoming Smartphone in May 2024 : दमदार फीचर्स अन् जबरदस्त कॅमेरासह मे महिन्यात लॉन्च होणार Vivo, Apple सारखे स्मार्टफोन, लिस्ट पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com