Upcoming Smartphone in May 2024 : दमदार फीचर्स अन् जबरदस्त कॅमेरासह मे महिन्यात लॉन्च होणार Vivo, Apple सारखे स्मार्टफोन, लिस्ट पाहा

5G Smartphone Launch In May : मे २०२४ मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन बाजारात येणार आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन हवा असेल तर पुढील महिन्यात खरेदीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध होतील.
Upcoming Smartphone in May 2024
Upcoming Smartphone in May 2024Saam Tv

Upcoming Smartphone In May Month:

महिन्याच्या सुरुवातीला अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात लॉन्च होत असतात. अशातच मे महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.

मे २०२४ मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन (Smartphone) बाजारात येणार आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन हवा असेल तर पुढील महिन्यात खरेदीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध होतील. बजेट आणि फ्लॅगशिप सेगमेंटमधील स्मार्टफोन मे महिन्यात सुरुवातीपासून लॉन्च होतील. या महिन्यात Vivo, Apple, Motorola यांसारख्या इतर कंपन्यांनी लॉन्च केलेले नवीन स्मार्टफोन पाहायला मिळतील. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. Vivo V30e स्मार्टफोन

Vivo कंपनीतर्फे Vivo V30e स्मार्टफोन मे महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन २ मे ला बाजारात (Market) येईल. यात युजर्सना 6.78 इंच डिस्प्ले मिळेल. तसेच Vivo Snapdragon 6 Gen 1 चिपसेटही मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी 50MP कॅमेरा देखील यात मिळणार आहे.

Upcoming Smartphone in May 2024
WhatsApp News : या ५ चुकांमुळे होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन, वेळीच थांबा

2. iPad Air 2024

मे महिन्यात Apple चा iPad Air 2024 लॉन्च केला जाईल. अॅपलचा हा नवा iPad ७ मे रोजी लॉन्च होऊ शकतो. यामध्ये ग्राहकांना स्पेशल एडिशन मिळणार आहे. अॅपलच्या या नवीन आयपॅडमध्ये ग्राहकांना 12 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या आयपॅडची किंमत (Price) २.५ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत असेल.

3. Moto E14 स्मार्टफोन

मागच्या काही महिन्यात मोटोरोला कंपनीने अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यात मे महिन्यात भारतीय बाजारात नवीन फोन Moto E14 लॉन्च करु शकते. कंपनीने अजूनही हा फोन कधी लॉन्च होणार हे सांगितले नाहीये. यामध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा डिस्प्ले, 90Hz चा रिफ्रेश रेट आणि त्यासोबत Unisoc T606 चिपसेट दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल. या फोनची किंमत साधारणत: २० हजार इतकी असू शकेल.

Upcoming Smartphone in May 2024
AC खरेदी करताना ५ चुका करू नका, वाया जातील पैसे

4. iQOO Z9X स्मार्टफोन

IQ देखील मे महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. IQ या महिन्यात iQOO Z9X लाँच करेल अशी शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा IPS डिस्प्ले असेल. यामध्ये कंपनी Snapdragon 6 Gen 1 चिपसेट देऊ शकते. यामध्ये 6000mAh बॅटरी मिळेल असे समजले आहे. हा फोन कधी लॉन्च होईल याबद्दल कंपनीने अजून सांगितले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com