AC खरेदी करताना ५ चुका करू नका, वाया जातील पैसे

AC Buying Tips :कडक उन्हाळ्यात तुम्ही नवीन AC खरेदी विचार करत असाल तर, तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे.
AC
AC Saam Tv

मुंबई : देशातील बहुतांश भागात कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश भागातील तापमान हे ४० डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक पोहोचलं आहे. या कडक उन्हाळ्यात तुम्ही नवीन AC खरेदी विचार करत असाल तर, तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे.

तुम्ही स्वस्तातील एसी खरेदी करायचा विचार करताय?

तुम्ही कडक उन्हामुळे स्वस्तातील एसी खरेदी करता. त्यानंतर त्या कंपनीला दुषणे देता. त्यामुळे अशा चुका करू नका. एसीची खरेदी करताना तुमच्या खोलीच्या एकूण जागेचा विचार करा. त्यानंतर AC निवडा. छोट्या खोलीसाठी कमी टनचा AC चांगला पर्याय आहे. तर मोठ्या रुमसाठी डिस्काउंट ऑफर पाहून AC खरेदी करू नका.

AC
Ceilling Fan Cleaning Tips: पंखा साफ करताना या टीप्स फॉलो करा, नव्यासारखा चमकेल

एनर्जी-एफ्फिसिएंट AC खरेदी करणे चांगला पर्याय आहे. यामुळे पैसे आणि वीजेची बचत होईल. स्वस्तातील एसी खरेदी करण्याच्या विचारात कमी स्टार असणारा एसी खरेदी करू नका. घरात तुम्ही ८ ते १० तास एसी वापरणार असाल, तर ३ स्टार एसी खरेदी करण्यावर भर द्या.

AC
Adipurush Film Fans Reaction: पब्लिकचा नादच न्हाय! 'आदिपुरूष'ला भंगार म्हणाला, पडेपर्यंत तुडवला; व्हिडिओ व्हायरल

इन्वर्टर कि नॉन इन्वर्टर एसी?

स्लिप्ट एसीमध्ये आता इन्वर्टर आँणि नॉन इन्वर्टर असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. इन्वर्टरच्या एसीची किंमत ही ३००० ते ५००० रुपयांहून अधिक असू शकते. चांगल्या दर्जाचा एसी खरेदी केल्यास चांगला फायदा मिळू शकतो. तसेच नेहमी चांगल्या ब्रँडचे एसी खरेदी करा. असे एसी अधिक काळ टिकतात. लवकर खराब होत नाही. एसी खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन कस्टमर Review देखील तपासून घ्या. त्यानंतर एसी खरेदी करण्याचा निर्णय घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com