Ceilling Fan Cleaning Tips: पंखा साफ करताना या टीप्स फॉलो करा, नव्यासारखा चमकेल

How To Clean Celling fan: प्रत्येकाला आपले घर स्वच्छ असावे असे वाटते. घराची साफसफाई करताना पंखादेखील साफ केला जातो. पंखा साफ करताना नेहमी काळजी घ्यायची असते. पंख्याचे पाते लोखंडाचे असते त्यामुळे पंखा व्यवस्थित साफ करावा.
Celling fan
Celling fanSaam Tv
Published On

Home Care Tips Know How To Clean Ceilling Fan:

प्रत्येकाला आपले घर स्वच्छ असावे असे वाटते. घराची साफसफाई करताना फॅनदेखील साफ केला जातो.फॅन साफ करताना नेहमी काळजी घ्यायची असते. फॅनचे पाते हे लोखंडाचे असते. त्यामुळे त्याला गंज असण्याची शक्यता असते. त्यामुळे फॅन साफ करताना कधीही त्याला पाणी लावू नये. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सिलिंग फॅन साफ करण्याच्या टीप्स सांगणार आहोत. (Latest News)

व्हॅक्यूम क्लिनर

बरेच लोक व्हॅक्यूम क्लिनरने सोफा, बेड साफ करतात. मात्र, तुम्ही फॅन साफ करतानादेखील व्हॅक्यूम क्लिनरची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही खुर्चीवर किंवा टेबलवर चढून व्हॅक्यूम क्लिनरच्या साहाय्याने पंखा साफ करु शकता. यामुळे पंख्यावरील धूळ पूर्णपणे निघून जाईन.

मऊ कपडा किंवा मौजे

मऊ कपडा किंवा मोजे वापरुन तुम्ही पंखा स्वच्छ करु शकता. यासाठी तुम्हाला मौजे थोडेसे ओले करुन पिळून घ्यावे लागतील. त्यानंतर पंख्याच्या पात्यावर झाकून ठेवावे लागतील. त्यानंतर काही वेळाने हे मौजे स्वाइप करा. यामुळे पंख्यावरील सर्व घाण निघून जाईन.

Celling fan
Surmai Fry Recipe : खवय्यांनो, हॉटेलसारखी बनवा एकदम चमचमीत अन् कुरकुरीत सुरमई फ्राय, रेसिपी पाहा

कोबवेब ब्रश

पंखा साफ करताना तुम्ही कोबवेब ब्रशदेखील वापरु शकता. घरात साफसफाई करताना अनेक लोक हा ब्रश वापरतात. पंख्याच्या पात्यावर कोबवेब ब्रश फिरवा आणि स्वाइप करा. असे केल्याने पंख्यावरील सर्व धूळ निघून जाईन.

फॅन साफ करताना नेहमी फॅन बंद आहे की नाही याची खात्री करा. फॅन सुरु असताना फॅन साफ करु नका. यामुळे इजा होण्याची शक्यता असते. तसेच फॅनला जास्त पाणी लावू नका. जेणेकरुन फॅनच्या पात्याला गंज पकडणार नाही.

Celling fan
Ladakh Tour Package : IRCTC ची बेस्ट टूर! बजेटमध्ये फिरा लडाख, बुकिंग खर्च किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com