Ladakh Tour Package : IRCTC ची बेस्ट टूर! बजेटमध्ये फिरा लडाख, बुकिंग खर्च किती?

Ladakh IRCTC Tour Full Package, Booking Process : लडाख हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. लडाखच्या खडकाळ रस्त्यावर बाईक चालवण्याचे आणि पँगॉन्ग लेकच्या निळ्या पाण्याचे सौंदर्य जवळून पाहाण्याची अनेकांची इच्छा असते.
Ladakh Tour Package
Ladakh Tour Package Saam Tv
Published On

IRCTC Tour Package For Ladakh:

लडाख हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. लडाखच्या खडकाळ रस्त्यावर बाईक चालवण्याचे आणि पँगॉन्ग लेकच्या निळ्या पाण्याचे सौंदर्य जवळून पाहाण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुमची देखील ही इच्छा असेल तर आयआरसीटीसीचा बजेट टूरने तुम्ही फिरायला जाऊ शकता.

लडाखला जाण्याचे प्लानिंग करत असाल तर आयआरसीटीसी तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात तुम्ही या ठिकाणी फिरण्याचा प्लान करु शकता. राहण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व सुविधा या पॅकेजमध्ये (Package) तुम्हाला मिळेल. बुकिंग खर्च (Price) किती जाणून घ्या.

पॅकेजचे नाव - IRCTC- LTC Approved (NDA12) Tour

पॅकेज कालावधी - ६ रात्री आणि ७ दिवस

प्रवास - फ्लाइट मोड

कुठे फिरता येईल?

लेह आणि लडाख

प्रवासाची तारीख

एप्रिल आणि मे महिना

Ladakh Tour Package
Aurangabad Travel Place : पर्यटकांना भुरळ घालणारी औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळे, सुट्टीच्या दिवशी नक्की जा

1. कोणत्या सुविधा मिळतील?

  • या टूर (Tour) पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.

  • राहाण्यासाठी हॉटेलची सुविधा तसेच नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे.

  • यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळत आहे.

Ladakh Tour Package
Kolhapur Travel Places : ऐतिहासिकतेचा वारसा असलेलं कोल्हापूर, फॅमिलीसोबत या ठिकाणांना भेट द्या

2. प्रवासाचा खर्च किती?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ५६,७०० रुपये (Price) मोजावे लागतील.

  • कपल्स जाणार असाल तर प्रत्येक व्यक्तीला ५१,५०० रुपये द्यावे लागतील.

  • तीन लोकांसाठी प्रति व्यक्तीला ५०,८०० रुपये भरावे लागतील. जर यामध्ये तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला बेडसाठी (5-11 वर्षे) ४९,५०० रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय ४४,४०० रुपये मोजावे लागणार आहे.

  • IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती ट्विट करुन दिली आहे. जर तुम्हाला लडाखचे सुंदर दृश्य पाहायचे असेल तर या टूर पॅकेजचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

3. बुकिंग प्रोसेस

या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com