कोमल दामुद्रे
औरंगाबादला दारांचे शहर म्हटले जाते. हे भारतातील अतिशय लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे.
महाराष्ट्रात वसलेल्या या शहराचा इतिहास, वास्तूकला आणि नयनरम्य निसर्ग दरवर्षी हजारो पर्यटकांना खुणावणारे आहेत.
अजिंठा आणि एलेरा लेण्या ही औरंगाबादमधील दोन सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे.
औरंगाबाद शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. बीबी का मकबरा हा भारतातील सर्वोत्तम मुघल वास्तूकलेचा नमुना मानला जातो.
दौलताबाद शहर हे औरंगाबादपासून १५ किमी अंतरावर असून रस्ते मार्गाने सर्व मुख्य शहरांना जोडण्यात आला आहे.
एलोरा लेण्यांपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर घृष्णेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून औरंगाबादमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
या वस्तूसंग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध छायाचित्रे पाहायला मिळतात. तसेच यात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि युद्धसाहित्य पाहायला मिळतात.