कोमल दामुद्रे
पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आणि सांस्कृतिक राजधानी आहे.
महाराष्ट्रातील सर्वात खास पर्यटनस्थळांपैकी एक पुणे मानले जाते.
तुम्ही देखील यंदाच्या व्हॅलेंटाइनला पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करताय तर या ठिकाणांना भेट द्या.
शनिवारवाडा म्हणजे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण. या ठिकाणी तुम्हाला ऐतिहासिक वास्तू पाहाता येतील.
सारस बाग हे पुण्यातील स्वारगेटजवळ असलेले एक ऐतिहासिक उद्यान आहे. या बागेत हिरवीगार झाडे आणि विविध रंगांची फुले पाहायला मिळतात.
पुण्यात शॉपिंग करायची असेल तर तुम्ही तुळशीबागला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला स्वस्त किमतीत वस्तू मिळतील.
पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. मुख्य पुणे शहरात असलेल्या या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांवर वसलेल्या सिंहगड किल्ल्याला भेट द्या जिथून तुम्हाला हिरवळ, सुंदर धबधबे यांचे नयनरम्य दृश्य पाहता येते.
पुण्यापासून जवळ असलेल्या ठिकाणांमध्ये लोणावळा हे ठिकाण फारच लोकप्रिय आहे.
लोणावळ्यापासून अगदी पाच किलोमीटरवर असलेलं खंडाळा देखील पर्यटन स्थळ आहे.