Surmai Fry Recipe : खवय्यांनो, हॉटेलसारखी बनवा एकदम चमचमीत अन् कुरकुरीत सुरमई फ्राय, रेसिपी पाहा

Fish Fry Recipe : मासे म्हटलं की, अनेक नॉन व्हेज प्रेमींच्या जीभेला पाणी सुटते. हॉटेलमध्ये किंवा घरी आपण अनेकदा फिशच्या अनेक रेसिपी ट्राय करतो. भाकरीसोबत चमचमीत अन् कुरकुरीत फिश फ्राय अनेकजण चवीने खातात.
Surmai Fry Recipe
Surmai Fry RecipeSaam Tv
Published On

How To Make Surmai Fry :

मासे म्हटलं की, अनेक नॉन व्हेज प्रेमींच्या जीभेला पाणी सुटते. हॉटेलमध्ये किंवा घरी आपण अनेकदा फिशच्या अनेक रेसिपी ट्राय करतो. भाकरीसोबत चमचमीत अन् कुरकुरीत फिश फ्राय अनेकजण चवीने खातात.

मासे हे केवळ चवीपुरता नाही आरोग्यासाठीही पौष्टिकही असतात. फिश फ्राय म्हटलं की, सर्वाच्या आवडीचा प्रकार. फिश फ्राय खूप वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो. कुरकुरीत पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, चिलापी फ्राय, कोळंबी फ्राय रेसिपी, हॉटेल मध्ये मिळतो तसा कुरकुरीत फिश फ्राय, बरेच प्रकार आहेत. जर तुम्हाला हॉटेलसारखी एकदम चमचमीत अन् कुरकुरीत सुरमई फ्राय खायची असेल तर ही रेसिपी (Recipes) नक्की ट्राय करा.

1. साहित्य

  • सुरमईचे तुकडे २०-२५ I Surmai Piece 20-25

  • आले लसूण पेस्ट २ चमचा I Ginger Garlic Paste 2 tbsp

  • हळद १ चमचा I Turmeric 1 tsp

  • लाल मिरची पावडर १-१.५ चमचा I Red Chili Powder 1-1.5 tsp

  • मीठ चवीनुसार I Salt as per taste

  • धणे पूड २ चमचे I Coriander Powder 2 tsp

  • लिंबू रस २ चमचा I Lemon Juice 2 tsp

  • फिश फ्राय मसाला ४ चमचे I Fish Fry Masala 4 tsp

  • पाणी २-३ चमचा I Water 2-3 tbsp

  • बारीक रवा १ वाटी I Small Semolina 1 cup

  • तेल १/४ वाटी I Oil ¼ cup

  • कांदा रिंग्स गार्निशिंग I Onion Rings for Garnishing

  • कोथिंबीर गार्निशिंग I Coriander for Garnishing

Surmai Fry Recipe
Mix Dal Chutney Recipe : घरच्या घरी बनवा मार्केटसारखी मिश्र डाळींची चटणी, ३ महिने टिकेल; पाहा रेसिपी

2. कृती

  • सर्वात आधी सुरमईचे तुकडे करा आणि दोन्ही बाजूने आलं-लसूणची पेस्ट कोट करा.

  • त्यानंतर एका भांड्यात हळद, मीठ, लाल तिखट, फिश फ्राय मसाला, लिंबाचा रस घेऊन चांगले मिक्स करा. थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करा.

  • नंतर ही पेस्ट सुरमईच्या दोन्ही बाजूंना लावून १५ मिनिटे तसेच ठेवा.

  • एका प्लेटमध्ये रवा, मीठ, फिश मसाला घ्या आणि सर्व एकत्र करा.

  • रव्याच्या मिश्रणात सुरमईचे तुकडे घाला.

  • तवा गरम करुन त्यात तेल टाका, मंद आचेवर गरम झाल्यावर तयार सुरमईचे काप घाला.

  • सुरमईचे काप मंद आचेवर दोन्ही बाजूंनी तळून घ्या. क्रिस्पी सुरमई फिश फ्राय तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com