Mix Dal Chutney Recipe : घरच्या घरी बनवा मार्केटसारखी मिश्र डाळींची चटणी, ३ महिने टिकेल; पाहा रेसिपी

Mix Nuts Chutney Recipe : महाराष्ट्रातील विविध राज्यात चटणी बनवण्याच्या पद्धतीपासून त्याच्या चवीपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. जेवताना वरण-भातासोबत आपल्याला तोंडी लावायला चटणी किंवा लोणचे हवे असते. त्यासाठी आपण बाजारातून अनेक प्रकारची चटणी किंवा लोणचे आणतो.
Mix Dal Chutney Recipe
Mix Dal Chutney RecipeSaam Tv
Published On

How To Make Mix Daal Chutney :

ऋतू कोणताही असो, जेवताना तोंडी लावताना ताटाच्या डाव्या बाजूला हमखास वाढला जाणारा पदार्थ चटणी. महाराष्ट्रातील विविध राज्यात चटणी बनवण्याच्या पद्धतीपासून त्याच्या चवीपर्यंत अनेक गोष्टी बदलतात.

जेवताना वरण-भातासोबत आपल्याला तोंडी लावायला चटणी किंवा लोणचे हवे असते. त्यासाठी आपण बाजारातून अनेक प्रकारची चटणी किंवा लोणचे आणतो. पण जर तुम्हाला घरच्या घरी चटणी बनवायची असेल तर मिश्र डाळींची चटणी बनवू शकता. सगळे दाणे वापरून केलेली ही चटणी, पौष्टिक तर होतेच शिवाय कोणत्याही व्हेज थाळी ची रंगत वाढवते. खमंग बाजरीची भाकरी, त्यावर चटणी आणि शेंगदाण्याचं कच्चं तेल. मस्त गावरान खमंग बेत होतो ३ महिने टिकेल पाहूया रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • तीळ ३ चमचा I Sesame 3 tbsp

  • जवस ३ चमचा I Javas/Flaxseed 3 tbsp

  • शेंगदाणे ३ चमचा I Groundnut 3 tbsp

  • सुके खोबरे ३ चमचा I Dry Coconut 3 tbsp

  • कारळे / खुरसनी - ३ चमचा I Khursani 3 tbsp

  • कढीपत्ता १/४ वाटीI Curry Leaves 1/4 cup

  • जिरे १ चमचा I Cumin Seeds 1 tbsp

  • लसूण ७-८ पाकळ्या I Garlic 7-8 cloves

  • मिरची पावडर २ चमचा I Red Chili powder 2 tbsp

  • मीठ १/२ चमचा | Salt ½ spoon

Mix Dal Chutney Recipe
Vegetable Masala Recipe : मार्केटसारखा घराच्या घरी बनवा भाजी मसाल, चव येईल एकदम भारी; पाहा रेसिपी

2. कृती

  • सर्वात आधी तीळ, शेंगदाणे, जवस, सुके खोबरे, कढीपत्ता सर्व पदार्थ वेगवेगळे कोरडे भाजून घ्या.

  • त्यात जिरे वेगळे भाजून प्लेटमध्ये ठेवा.

  • सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये घ्या. त्यात लसूण पाकळ्या, तिखट आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या.

  • झणझणीत, चवदार आणि मसालेदार चटणी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com