Vegetable Masala Recipe : मार्केटसारखा घराच्या घरी बनवा भाजी मसाल, चव येईल एकदम भारी; पाहा रेसिपी

Hotel Style Vegetable Masala : भाज्यांना नवीन चव हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी भाजीचा मसाला ट्राय करु शकतात. पाहूया झणझणीत भाजी मसालाच्या रेसिपी
Vegetable Masala Recipe
Vegetable Masala RecipeSaam Tv
Published On

How To Make Vegetables Masala :

मसालेदार पदार्थ कोणाला खायला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना झणझणीत पदार्थाची चव चाखायला आवडते. परंतु, हल्ली हॉटेलसारखी चव चाखायला मिळत नाही.

आजकाल लोक त्यांच्या रोजच्या जेवणात पॅकेट मसाले वापरतात. बाजारात अनेक प्रकारचे मसाले सहज मिळतात. विशेषत: भाज्या बनवण्यासाठी अनेक प्रकारचे भाजी मसाले उपलब्ध आहेत. ज्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. भाज्यांना नवीन चव हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी भाजीचा मसाला ट्राय करु शकतात. पाहूया झणझणीत भाजी मसालाच्या रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • धणे- २ ते ३ चमचे

  • बडीशेप - २ चमचे

  • जिरे- २ चमचे

  • पांढरे तीळ - २ चमचे

  • शेंगदाणे - दीड वाटी

  • चण्याची डाळ - २ चमचे

  • उडीद डाळ - २ चमचे

  • सुक्या लाल मिरच्या - ५

  • लसूण (Garlic) पाकळ्या - ८ ते १०

  • कढीपत्ता

  • सुके खोबरे - २ चमचे

  • चवीनुसार मीठ

  • हळद - १ चमचा

  • सुकलेला कैरी पावडर - २ ते ३ चमचे

  • खसखस - दोन चमचे

  • तेल (oil)

Vegetable Masala Recipe
Rose Day 2024 Recipe : 'रोझ डे' ला बनवा स्पेशल कोकोनट गुलाबाचे लाडू, पार्टनर होईल खुश; पाहा रेसिपी

2. कृती

  • जाड तळाचा तवा घेऊन त्यात धणे, बडीशेप, जिरे आणि पांढरे तीळ कोरडे भाजून घ्या. नंतर खसखस घालून तळून घ्या. गॅसची बंद करा.

  • भाजलेले मसाले ताटात काढा आणि शेंगदाणे कोरडे भाजून मसाल्यात मिसळा.

  • दोम चमचे तेल घालून हरभऱ्याची डाळ सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तसेच उडीद डाळ आणि कोरडी लाल मिरची तेलात तळून घ्या.

  • डाळ तळल्यावर त्यात लसूण आणि कढीपत्ता मिसळा.

  • नीट मिक्स केल्यानंतर त्यात सुक्या खोबऱ्याची पूड घाला.

  • सर्व गोष्टी नीट तळीन घ्या आणि गॅस बंद करा.

  • त्यात कोरडे भाजलेले मसाले ग्राइंडरच्या भांड्यात बारीक करुन पावडर बनवा.

  • नंतर तेलात तळलेली डाळ, लसूण, मिरची आणि खोबरे बारीक करुन घ्या. सर्व मसाल्यांची पावडर घालून मिक्समध्ये पुन्हा एकत्र वाटा.

  • वरुन मीठ, हळद, कैरीची पूड घालून मिक्सरमध्ये वाटा करा.

  • हा मसाला हवाबंद काचेच्या बरणीत साठवा. भाजी बनवताना वापरल्यास जेवणाची चव वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com