Samsung Galaxy F55 5G
Samsung Galaxy F55 5G Google

जबरदस्त फीचर्स आणि 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F55 5G लाँच; मिळतोय २ हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

Samsung Galaxy F55 5G Price: सॅमसंग कंपनीने नुकताच Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन उत्तम फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर २ हजार रुपयांची सूट मिळत आहे.

सॅमसंग कंपनी ग्राहकांसाठी नवीन फोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच आपला Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन १७ तारखेला लाँच होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, स्मार्टफोन २७ तारखेला भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन अनेक नवीन फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे.

कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर व्हेगन लेदर फिनिशचा वापर केला आहे. यामुळे स्मार्टफोनला अजूनच चांगला लूक आला आहे. कंपनीचा स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनसह बाजारात उपलब्ध आहे.

किंमत Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोनच्या 8GB/128GB मॉडेलची किंमत २६,९९९ रुपये आहे. तर 8GB/256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर टॉप व्हेरियंट 12GB/256GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ३२,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला २,००० रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. एचडीएफसीच्या कार्डवर ही सूट दिली जाणार आहे. या ऑफरअंतर्गत स्मार्टफोनचा 45W पॉवरचा अॅडॅप्टर ४९९ रुपयांना खरेदी करु शकतात किंवा १,९९९ रुपयांचे Galaxy Fit 3 स्मार्टवॉच देखील घेऊ शकता. ही ऑफर फक्त ३१ मे पर्यंत उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F55 5G
RBI Action: मोठी बातमी! आरबीआयची येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई, काय आहे प्रकरण?

Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेटसह येतो. यात 1000 Nits चा पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. हा हँडसेट Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8MPचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F55 5G
Abroad Job: परदेशात तरुणांना नोकरीची मोठी संधी; भारत सरकार करतंय मदत; कसं? सविस्तर जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com