50MP कॅमेरा अन् 6000mAh बॅटरीसह स्वस्तात मस्त iQOO Z9x 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

iQOO Z9x 5G Price : बजेटमध्ये स्मार्टफोन घ्यायचा तुम्हीही विचार करत असाल तर iQOO Z9x 5G स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता. बजेटमध्ये उत्तम क्वालिटीचा हा स्मार्टफोन खूप चांगला आहे.
iQOO Z9x 5G
iQOO Z9x 5GGoogle

स्मार्टफोन हा सध्याच्या काळाजी गरज आहे. अनेकजण सतत आपला स्मार्टफोन बदलत असतात. कधी जुना फोन बिघडला तर नवीन फोन घेतात. स्मार्टफोन घेतेना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. बजेटमध्ये स्मार्टफोन घ्यायचा तुम्हीही विचार करत असाल तर iQOO Z9x 5G स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता. बजेटमध्ये उत्तम क्वालिटीचा हा स्मार्टफोन खूप चांगला आहे.

iQOO कंपनीने नुकताच आपला iQOO Z9x 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन उत्तम फीचरसह बाजारात आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 88GB रॅम आहे. स्मार्टफोन Android 14 वर काम करतो. हा स्मार्टफोन 128GB स्टोरेजसह बाजारात उपलब्ध आहे.

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन 50MP मुख्य लेन्ससह येतो. फोनला 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

iQOO Z9x 5G
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी अपडेट; वाहनाची टाकी फुल करण्याआधी वाचा आजचे दर

किंमत

हा स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनसह येतो. कंपनीने स्मार्टफोन 4GB RAM+ 128GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज, 12GB रॅम+ 128GB स्टोरेजसह लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम व्हेरियंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर 6GB रॅम व्हेरियंटची किंमत १४,४९९ रुपये तर 8GB रॅमची किंमत १५,९९९ रुपये आहे.

हा स्मार्टफोन टोनॅर्डो ग्रीन आणि स्टॉर्म ग्रे या कलरमध्ये खरेदी करु शकतो. हा स्मार्टफोन तुम्ही अॅमेझॉन या साइटवरुन खरेदी करु शकता. फोनची विक्री २१ मे पासून सुरु होणार आहे.

iQOO Z9x 5G
Bajaj ची ही स्टायलिश बाईक देते 49 किमीचा जबरदस्त मायलेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com