Amazon Great Indian Festival Sale 2023: अॅमेझॉन सेलमध्ये बंपर सूट; या बँकेच्या कार्डवरुन होणार पैशांची भरमसाठ बचत

Amazon Great Indian Festival Sale : अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची सुरुवात झाली आहे.
Amazon Great Indian Festival Sale 2023
Amazon Great Indian Festival Sale 2023Saam Tv

Amazon Great Indian Festival Sale Offers :

देशात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सणांना सुरुवात झाली म्हणजे अनेक सेल सुरू होतात. यामध्ये जबरदस्त सूट आणि ऑफर्स मिळतात. अॅमेझॉनने नुकतीच 'द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'ची घोषणा केली आहे. अॅमेझॉनचा 2023 मधील सर्वोत्तम सेल आहे.

अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल प्राइम युजर्ससाठी शुक्रवार रात्रीपासूनच सुरु झाला आहे. इतर युजर्ससाठी हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सेलमध्ये मोबाईलपासून ते इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर भरघोस सूट मिळणार आहे. यामध्ये अनेक बँक ऑफर्स मिळणार आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2023
Blood Pressure : ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे आहे? रोज सकाळी ही ४ कामे कराच

1. अॅमेझॉन सेलमध्ये बँक ऑफर

अॅमेझॉन सेलमध्ये अनेक बँकाच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर सूट मिळणार आहे. SBI च्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरुन खरेदी केल्यावर 10% सूट मिळणार आहे. अॅमेझॉन पे वापरुन आयसीआयसीआय बँकेचा वापर केल्यास 5% टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.

2. अॅमेझॉन पे ऑफर्स

अॅमेझॉन पे वापरुन तुम्ही सेलमध्ये अनेक ऑफर्स आणि सूट मिळवू शकता. अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड खरेदी केल्यास तुम्हाला 10% कॅशबॅक मिळेल. अॅमेझॉन पे वापरुन खरेदी केल्यास 10,000 पर्यंतचे क्रेडिट मिळू शकते. या ऑफर्समध्ये एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय हे पर्याय उपलब्ध आहे.

3. घरगुती प्रोडक्ट्सवर 65% पर्यंत सूट

अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक घरगुती उपकरणे, टीव्ही आणि स्मार्टफोनवर खूप ऑफर्स आहे. सेलमध्ये घरगुती उपकरणांवर 65% सूट मिळवू शकता तसेच अनेक गोष्टींवर 75% टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.

Amazon Great Indian Festival Sale 2023
Power Nap Importance : दुपारी जेवल्यानंतर 15 मिनिटं झोपण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे! वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com