Blood Pressure : ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे आहे? रोज सकाळी ही ४ कामे कराच

Morning Routine : रोज सकाळी उठल्यानंतर या ४ गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे रक्तदाब वाढणार नाही.
Blood Pressure
Blood Pressure Saam tv
Published On

Blood Pressure Causes :

रक्तदाब अचानक वाढला किंवा कमी झाला की, आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सध्याच्या काळात रक्तदाब कंट्रोल कसा करायचा हा प्रश्न अनेकांसमोर आहे.

रक्तावर जास्त प्रमाणात ताण आला की, त्याचा परिणाम हृदय किंवा रक्तवाहिन्यांवर होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचा त्रास आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. मात्र खाण्यापिण्याच्या किंवा आरोग्याच्या काही सवयी बदल्या तर नक्कीच आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते. त्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर या ४ गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे रक्तदाब वाढणार नाही.

बीपी नियंत्रित करण्यासाठी सकाळी काय करावे?

1. उठण्याची वेळ निश्चित करा

कोणत्याही आजारावर (Disease) नियंत्रण मिळवायचे असेल तर पुरेशी झोप घेणे अधिक महत्त्वाचे आहे. जसे रात्रीची झोप अधिक महत्त्वाची असते तशीच सकाळी उठण्याची वेळ देखील निश्चित करा. मानसिक ताण घेऊ नका.

2. एक ग्लास पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. तसेच दिवसभर हायड्रेट राहाता येईल हे देखील पाहा. ज्यामुळे रक्तदाब (Blood Pressure) कमी होईल. तसेच पाणी (Water) पिण्याऐवजी तुम्ही ज्यूसचे देखील सेवन करु शकता.

Blood Pressure
Chicken Biryani Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चिकन बिर्याणी, चव चाखतच राहाल; पाहा रेसिपी

3. व्यायाम

शारीरिक हालचाल ही अधिक महत्त्वाची असते. त्यासाठी चालणे, जॉगिंग करणे, सायकलिंग, पोहणे किंवा एरोबिक व्यायाम करा. किमान १ तास तरी चाला ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होईल. व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ ही उत्तम आहे.

Blood Pressure
Yoga Asanas for Arm Fat : हातावरील अतिरिक्त चरबी कशी कमी कराल? दररोज ५ मिनिटे करा ही योगासने करा, आठवड्याभरात रिजल्ट मिळेलच

4. चहा-कॉफी पिऊ नका

अनेकांना सकाळची सुरुवात ही चहा- कॉफी करायची सवय असते. यामध्ये कॅफीन मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे रक्तदाब अचानक वाढतो. ज्या पेयामुळे ब्लड प्रेशर वाढते त्याचे सेवन करु नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com