Bajaj ची ही स्टायलिश बाईक देते 49 किमीचा जबरदस्त मायलेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar N150: देशात बजाज कंपनी आपला स्टायलिश बाईक मायलेज बाईकसाठी ओळखली जाते. यातच बाजारात कंपनीची हाय पॉवर बाईक बजाज पल्सर एन 150 आहे.
Bajaj BIke
Bajaj BIkeSaam Tv

Bajaj Pulsar N150:

देशात बजाज कंपनी आपला स्टायलिश बाईक मायलेज बाईकसाठी ओळखली जाते. यातच बाजारात कंपनीची हाय पॉवर बाईक बजाज पल्सर एन 150 आहे. या बाईकची टॉप स्पीड 115 Kmph असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही बाईक 149.68cc हाय पॉवर इंजिनसह येते.

ही बाईक 49 किमीचा देते, असा दावा कंपनीने केला आहे. बजाजच्या या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ड्युअल सस्पेन्शन आहे. कंपनी त्यात LED प्रोजेक्टर आणि DRL देते. ही बाईक 1.18 लाख रूपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Bajaj BIke
Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

याच बाईकचा टॉप मॉडेल 1.25 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. बाईकचे हाय पॉवर इंजिन 14.3 bhp पॉवर आणि 13.5 Nm टॉर्क जनरेट करते. यात एक साधा हँडलबार आहे. सुरक्षेसाठी बाईकच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक आहेत. बाईकमध्ये अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर आणि डिझायनर एक्झॉस्ट आहे. ही हायस्पीड बाईक आहे.

Bajaj Pulsar N150 फीचर्स

या बाईकमध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ही बाईक 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. इंधन टाकीवर ड्युअल टोन आणि ग्राफिक्स आहेत. याची इंधन टाकी 14 लिटरची आहे. यात ग्राहकांना एलईडी हेडलाइट मिळतील.

Bajaj BIke
110km रेंजसह 4 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 55 हजार रुपयांपासून सुरू

Bajaj Pulsar N150 मध्ये स्पीडोमीटर, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि साइड-स्टँड कट-ऑफ सेन्सर यासारखे फीचर्स आहेत. बाईकमध्ये ओडोमीटर, ट्रिप मीटर देण्यात आले आहेत. ही बाईक अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमच्या अतिरिक्त सेफ्टीसह येते. बाईक 6000 rpm जनरेट करते, ज्यामुळे ती जास्त पिकअप देते. बाईकमध्ये ग्राहकांना 17 इंच टायर मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com