110km रेंजसह 4 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 55 हजार रुपयांपासून सुरू

GT Force: तुम्ही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर GT Force ने भारतात हाय आणि लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन रेंज लॉन्च केली आहे.
110km रेंजसह 4 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 55 हजार रुपयांपासून सुरू
GT ForceSaam Tv

New Electric Scooter:

तुम्ही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर GT Force ने भारतात हाय आणि लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन रेंज लॉन्च केली आहे. या नवीन स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 55,555 रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप मॉडेलची किंमत 84,555 रुपये आहे.

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने चार नवीन स्कूटर सादर केल्या आहेत. ज्यात GT Vegas, GT Ryd Plus, GT Oneplus Pro आणि GT Drive Pro मॉडेल्सचा समावेश आहे. या नवीन स्कूटर्सची खास डिझाइन विद्यार्थी, ऑफिसमध्ये जाणारे आणि फ्रीलान्स कामगारांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्कूटर जबरदस्त परफॉर्मन्स देतील.

110km रेंजसह 4 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 55 हजार रुपयांपासून सुरू
Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

GT Vegas फीचर्स आणि किंमत

नवीन जीटी वेगास ही लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची एक्स-शोरूम किंमत 55,555 रुपये आहे. या स्कूटरमध्ये BLDC मोटर आणि 1.5 kWh लिथियम आयन बॅटरी आहे. याची बॅटरी 4-5 तासांत पूर्ण चार्ज होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 70 किलोमीटरपर्यंत धावू शकते आणि याची स्पीड 25 किमी प्रतितास आहे. याची लोडींग क्षमता 150 किलो, सीटची उंची 760 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आणि वजन 88 किलो आहे.

GT Ryd Plus फीचर्स आणि किंमत

GT Ride Plus ही लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची एक्स-शोरूम किंमत 65,555 रुपये आहे. यात 2.2 kWh लिथियम आयन बॅटरी आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 95 किलोमीटरपर्यंत धावू शकते. याची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे आणि लोड क्षमता 160 किलो आहे. जीटी राइड प्लसची सीटची उंची 680 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आणि वजन 90 किलो आहे.

110km रेंजसह 4 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 55 हजार रुपयांपासून सुरू
405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

GT One Plus Pro फीचर्स आणि किंमत

ही हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची टॉप स्पीड 70kmph आहे. याची लोड क्षमता 180 किलो आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 110 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यात लिथियम आयन बॅटरी आहे. ही स्कूटर 4-5 तासांत पूर्ण चार्ज होते. याचे ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी आणि वजन 80 किलो आहे.

GT Drive Pro फीचर्स आणि किंमत

ही कंपनीची सर्वाधिक स्पीड असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात पॉवरफुल BLDC मोटर आणि 2.5 kWh लिथियम आयन बॅटरी आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. याची लोड क्षमता 180 किलो आहे. याची ग्राउंड क्लीयरन्स 200 मिमी आणि वजन 85 किलो आहे. या स्कूटरची एक्स-शो रूम किंमत 84,555 रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com