POCO M6 Plus 5G लवकरच होणार भारतात लॉन्च, LCD डिस्प्लेसह मिळणार जबरदस्त फीचर्स

POCO M6 Plus 5G Features Explained in Marathi: आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी POCO लवकरच भारतात आपला नवीन फोन POCO M6 Plus 5G लॉन्च करू शकते.
POCO M6 Plus 5G लवकरच होणार भारतात लॉन्च, LCD डिस्प्लेसह मिळणार जबरदस्त फीचर्स
POCO M6 Plus 5G PhoneSaam TV

POCO F6 लॉन्च केल्यानंतर कंपनी आता भारतात आणखी एक नवीन फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. POCO आता भारतात POCO M6 Plus 5G लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने आधीच POCO M6 Pro 5G मॉडेल्सची सिरीज सादर केली आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BIS) वेबसाइटवरही हा फोन लिस्ट झाल्याचं दिसत आहे. येथे POCO M6 Plus 5G मॉडेल क्रमांक 24065PC95I सह दिसत आहे. याआधी हा स्मार्टफोन हायपरओएस कोडमध्येही दिसत होता. हा फोन Redmi Note 13 चे रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. यावरून या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि इतर गोष्टींचा अंदाज लावता येतो.

POCO M6 Plus 5G लवकरच होणार भारतात लॉन्च, LCD डिस्प्लेसह मिळणार जबरदस्त फीचर्स
फक्त 20,000 हजारात 43 इंचाचा Smart TV खरेदी करण्याची संधी, घरातच मिळेल सिनेमा हॉलसारखा आनंद

POCO M6 Plus 5G स्पेसिफिकेशन

हा फोन Redmi Note 13 ची रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. यात 6.79 इंच LCD डिस्प्ले मिळू शकतो. या फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशन दिले जाऊ शकते. या फोनमध्ये 550 चा पीक ब्राइटनेस दिसू शकतो. याचा रिफ्रेश रेट 90 Hz ते 120 Hz पर्यंत असू शकतो.

सेफ्टीसाठी फोनच्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकते. या फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स देखील यात दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

POCO M6 Plus 5G लवकरच होणार भारतात लॉन्च, LCD डिस्प्लेसह मिळणार जबरदस्त फीचर्स
Royal Enfield लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ही दमदार बाईक; मिळणार अॅडव्हान्स फीचर्स

याशिवाय फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिपसेट 12 GB रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज असू शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, POCO M6 Plus 5G ला 5,000mAh बॅटरीसह 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकतो. तसेच हा फोन Android 14 वर आधारित HyperOS वर चालू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com