फक्त 20,000 हजारात 43 इंचाचा Smart TV खरेदी करण्याची संधी, घरातच मिळेल सिनेमा हॉलसारखा आनंद

43 inch Smart TV Under: iFFALCON चा 43 इंचाचा Smart TV फक्त 20,000 हजारात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. यावर नेमकी काय आहे ऑफर, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...
फक्त 20,000 हजारात 43 इंचाचा Smart TV खरेदी करण्याची संधी, घरातच मिळेल सिनेमा हॉलसारखा आनंद
iFFALCON Smart TVSaam Tv

तुम्हीही कमी किंमतीत मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 43 इंच स्क्रीन आकारासह ब्रँडेड स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर मोठ्या फ्लॅट डिस्काउंटचा फायदा देण्यात आला आहे. चला तर याचबद्दल सावितर माहिती जाणून घेऊ...

ग्राहक iFFALCON ब्रँडेड U62 43 इंच अल्ट्रा HD (4K) स्मार्ट टीव्ही बंपर सवलतीत खरेदी करू शकतात. हा टीव्ही पॉवरफुल ड्युअल स्पीकर आणि बेझल-लेस प्रीमियम डिझाइनसह येतो. गुगल टीव्हीवर आधारित सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्या या टीव्हीवर 59 टक्क्यांपेक्षा जास्त सवलत दिली जात आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरसह याची किंमत आणखी कमी होते.

फक्त 20,000 हजारात 43 इंचाचा Smart TV खरेदी करण्याची संधी, घरातच मिळेल सिनेमा हॉलसारखा आनंद
Royal Enfield लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ही दमदार बाईक; मिळणार अॅडव्हान्स फीचर्स

ग्राहकांना iFFALCON द्वारे TCL U62 43 इंचाचा अल्ट्रा HD LED स्मार्ट टीव्ही सवलतीनंतर फक्त 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच आयसीआयसीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर 1250 रुपयांची सूटही दिली जात आहे. जुन्या टीव्हीच्या बदल्यात यावर 3500 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट देण्यात आली आहे.

iFFALCON Smart TV फीचर्स

मोठ्या स्क्रीनच्या iFFALCON स्मार्ट टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 43-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. हा टीव्ही फ्रेमलेस बेझल-लेस डिझाइनसह येतो. यात इन बिल्ड WiFi सपोर्ट मिळतो.

फक्त 20,000 हजारात 43 इंचाचा Smart TV खरेदी करण्याची संधी, घरातच मिळेल सिनेमा हॉलसारखा आनंद
Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लवकरच भारतात लॉन्च होणार Realme GT 7 Pro, मिळणार हे फीचर्स

याची HDR स्क्रीन टीव्ही पाहण्याचा आनंद दुप्पट करते. टीव्हीमध्ये ऑडिओ आणि व्हॉइस कंट्रोल फीचर्ससाठी 24W डॉल्बी स्पीकर देखील आहेत. या टीव्हीमध्ये तुम्ही Netflix, Disney + Hotstar, Amazon Prime Video, YouTube TV पाहू शकाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com