Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लवकरच भारतात लॉन्च होणार Realme GT 7 Pro, मिळणार हे फीचर्स

Realme GT 7 Pro: Realme लवकरच भारत आपला पॉवरफुल स्मार्टफोन Realme GT 7 Pro लॉन्च करू शकते.
Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लवकरच भारतात लॉन्च होणार Realme GT 7 Pro, मिळणार हे फीचर्स
Realme GT 7 ProSaam Tv

चायनीज स्मार्टफोन कंपनी Realme ची GT सिरीज सर्वात पॉवरफुल परफॉर्मन्स आणि बिल्ड-क्वालिटीसह येते. अलीकडेच Snapdragon 7+ Gen 3 Realme GT 6T भारतात लॉन्च करण्यात आला आणि आता कंपनीने भारतात आपला सर्वात पॉवरफुल फ्लॅगशिप फोन Realme GT 7 Pro लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष चेस जू यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर युजर्सरच्या प्रश्नाला उत्तर देताना नवीन लॉन्चबद्दल माहिती दिली आहे.

Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लवकरच भारतात लॉन्च होणार Realme GT 7 Pro, मिळणार हे फीचर्स
5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! Realme Narzo N65 5G लॉन्च, किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी

Realme उपाध्यक्ष चेस यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरून सोशल मीडिया युजर्सकडून GT सिरीजबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं. यावर S Tech नावाच्या युजरने विचारले की त्यांनी Realme GT 5 Pro भारतात का लॉन्च केला नाही. उत्तर देताना चेसने लिहिले की, या वर्षी कंपनी भारतात Realme GT 7 Pro लॉन्च करेल.

Realme GT 5 Pro गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह हा फोन आला होता. मात्र हा फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला नाही. आता असा अंदाज लावला जात आहे की, जूनमध्ये Realme GT 6 लॉन्च केल्यानंतर Realme GT 7 Pro सादर केला जाईल.

Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लवकरच भारतात लॉन्च होणार Realme GT 7 Pro, मिळणार हे फीचर्स
AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा; भारतात कधी लॉन्च होणार Samsung Galaxy F55 5G? जाणून घ्या

लीक रिपोर्टनुसार, Realme GT 7 Pro या वर्षाच्या अखेरीस Qualcomm Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरसह लॉन्च केला जाईल. कॅमेरा परफॉर्मन्सपासून ते डिस्प्लेपर्यंत हा Realme फोन पॉवरफुल असेल. यात अनेक अपग्रेड मिळवू शकतात. भारतात याच्या लॉन्चशी संबंधित नवीन माहिती पुढील काही आठवड्यांत समोर येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com