Samsung Galaxy F55 5G:
तुम्हीही सॅमसंगच्या Galaxy F55 5G स्मार्टफोनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने या फोनची लॉन्चिंग डेट जाहीर केली आहे. हा फोन 27 मे रोजी भारतात लॉन्च होणार आहे.
असं असलं तरी कंपनी हा फोन 17 मे रोजी लॉन्च करणार होती, असं सांगितलं जात होतं. मात्र ऐन वेळेला कंपनीने याची लॉन्चिंग डेट बदलली. कंपनीने याची लॉन्चिंग डेट का बदलली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आपला प्रीमियम दिसणारा स्मार्टफोन लॉन्च करणार होती.
दरम्यान, हा फोन लॉन्च झाल्यानंतर फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल. यासाठी एक मायक्रोसाइट आधीच लाईव्ह करण्यात आली आहे. Galaxy F55 5G अॅप्रीकॉट क्रश आणि रायसिन ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर केला जाईल.
कंपनीने ट्वीट करून Samsung Galaxy F55 5G च्या किंमतीबाबत हिंट दिली आहे. कंपनीने हिंट देताना सांगितलं आहे की, सुरुवातीची किंमत 2X999 रुपये असू शकते. हा फोन 20 हजार ते 29,999 रुपयांच्या दरम्यान लॉन्च होण्याची शक्यता आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.7-इंचाचा फुल-एचडी+ सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले असेल. जे 120Hz रीफ्रेश रेट आणि 1000 nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येऊ शकतात. याशिवाय फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा सिस्टम असेल, ज्याचा मेन कॅमेरा 50 एमपीचा असू शकतो.
याशिवाय यात Snapdragon 7 Gen 1 SoC प्रोसेसर मिळेल, जो 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह जोडला जाईल. Samsung One UI 6.0 सह Android 14 OS चालेल. कंपनी या फोनमध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.