एकीकडे इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरात अस्थिरतेचं वातावरण असताना AIमुळे सॉफ्टवेअर कंपन्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी ओरॅकलनं भारतातील 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. ही घटना ताजी असतानाच आता मेटा आणि मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात कंपन्याही तब्बल 23 हजार कर्मचा-यांची कपात करणार आहेत.
23 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
-मेटा 10% कर्मचारी कपात करणार, मे पासून अंमलबजावणी
-मेटामध्ये 8 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार
-मेटाकडून 6 हजार रिक्त पदं न भरण्याचा निर्णय
- मायक्रोसॉफ्टचाही स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव
- मायक्रोसॉफ्टच्या 8,750 अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
- ऑपरेशन्स अधिक प्रगत करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरणार
- कंपन्या डेटा सेंटर्स, AI प्रकल्पांवर जास्त खर्च करणार
- 29 एप्रिलच्या तिमाही निकालानंतर नोकरकपातीचं चित्र अधिक स्पष्ट होणार
दुसरीकडे AIचा फटका वाहन क्षेत्रालाही बसलाय. जर्मनीतील जगप्रसिद्ध वाहन कंपनी फॉक्सवॅगनने 2030 पर्यंत 50 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतलाय.नॅशनल फाउंडेशन फॉर एज्युकेशनल रिसर्च (NFER) च्या एका नवीन अहवालानुसार, एआय आणि ऑटोमेशनच्या एकत्रित वापरामुळे 2035 पर्यंत देशात 30 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे,
भारतातील कोण-कोणत्या क्षेत्रांवर किती परिणाम होणार आहे पाहूयात.
भारतात कोणत्या क्षेत्रांवर AIचा परिणाम ?
1. डेटा इन्ट्री ऑपरेटर्स - 85%
2. कॉल सेंटर एजंट्स - 80%
3. लोन प्रोसेसिंग ऑफिसर्स - 75%
4. ज्युनियर डेव्हलपर्स - 67%
5. सेल्स रिप्रेझेंटेटिव्हस - 67%
6. कॉपीरायटर्स - 60%
7. मार्केट रिसर्च अनालिस्ट्स - 53%
8. अकाऊंटिंग क्लर्क - 50%
आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनीही येत्या काही वर्षांत जगभरातील 40 टक्के नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होणार असल्याचं सांगितलयं...विकसित देशांमध्ये 60 टक्के लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'फ्यूचर ऑफ जॉब्स २०२५' या अहवालानुसार, 2030 पर्यंत जगभरातील 92 दशलक्ष नोकऱ्या जाणार आहेत. AI कडून अचूक, वेगवान काम होणार असल्याने नोकऱ्यांना कात्री लागणार आहे. त्यामुळे एआयचा सामना करताना निराश न होता काळाची पाऊल ओळखून स्वतःला अपडेट करणे हेच महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.