2000 च्या नोटेसंदर्भात RBI चा मोठा निर्णय, थेट ५ गोष्टी सांगितल्या; तुम्हाला काय करावे लागेल?

RBI 2000 note Update : तुमच्याकडे अजूनही ₹२,००० ची गुलाबी नोट आहे का? आरबीआयने नोटेच्या कायदेशीर दर्जाबाबत, जमा करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या ५ सूचना स्पष्ट केल्या आहेत.
RBI 2000 note Update
RBI 2000 note UpdateSaam TV
Published On

2000 Note Exchange Status : तुमच्या कपाटात अजूनही गुलाबी रंगाची २ हजार रूपयांची नोट आहे का? असेल तर आरबीआयने दिलेली महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयने प्रेस नोट जारी करत २ हजारांची नोट अजूनही चलनातून बाद झालेली नाही, अशी माहिती दिली आहे. २ हजार रूपयांची नोट तुमच्याकडे असेल तर ती अजूनही ती जमा करता येईल. (RBI latest update on ₹2000 note)

आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, मार्केटमधून जवळपास 98.47% नोटा परत घेण्यात आल्या आहेत. पण या नोटा अद्याप चलनातून बाद झालेल्या नाहीत. तुमच्याकडे २ हजारांची नोट असेल तर पोस्ट ऑफिसद्वारे आरबीआयकडे पाठवू शकता. आरबीआयने याबाबत ५ मुद्दे सांगितले आहे. तुमच्याकडे अद्याप दोन हजारांची गुलाबी नोट असेल तर काय करावे लागेल? हे जाणून घेऊयात..

98% नोटा आरबीआयकडे RBI cash deposit guidelines

१९ मे २०२३ रोजी २ हजार रूपयांच्या नोटांचं वितरण बंद केल्याची माहिती आरबीआयने दिली होती. त्यावेळी मार्केटमध्ये ३.५६ लाख कोटी रूपयांच्या २ हजारांच्या नोटा होत्या. ३० एप्रिल २०२६ रोजी आरबीआयच्या अहवालानुसार, मार्केटमध्ये २ हजारांच्या ५४५१ कोटी किंमतीच्या नोटा आहेत. म्हणजे, आतापर्यंत 98.47% नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. पण दीड टक्के नोटा अजूनही लोकांकडे आहेत. त्याबाबत आरबीआयने माहिती दिली आहे.

RBI 2000 note Update
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

२ हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्या का? ₹2000 note legal tender

२ हजार रुपयांची नोट अजूनही कायदेशीर (Legal Tender) आहे, म्हणजेच ती रद्द झालेली नाही. फक्त ती चलनात वापरली जात नाही. तुमच्याकडे २ हजारांची नोट असेल तर तुम्ही ती आरबीआयकडे जमा करू शकता. देशातील कोणत्याही बँकेत या नोटा बदलून घेण्याची किंवा खात्यात जमा करण्याची सुविधा ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उपलब्ध होती.

RBI 2000 note Update
Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

तुमच्याकडे २ हजारांची नोट असेल तर काय कराल? India Post ₹2000 note deposit Currency exchange rules India

२ हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी आरबीआयकडून काही पर्याय देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये २ हजारांच्या या नोटा बदलून मिळतात.

९ ऑक्टोबर २०२३ पासून या कार्यालयांमध्ये नोटा खात्यात जमा करण्याची सुविधाही सुरू आहे. सामान्य नागरिक देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून (India Post) या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालया पत्त्यावर पाठवू शकतात. आरबीआयकडे २ हजारांच्या नोटा पोहचल्यानंतर तेवढी रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

RBI 2000 note Update
Rent Agreement: रेंट एग्रीमेंट संपण्यापूर्वीच भाडेकरूने घर सोडल्यास डिपॉझिटचे काय होते? घरमालक पैसे जप्त करू शकतो का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com