Tourist in Goa drives XUV with kids sleeping on its roof Saamtv
व्हायरल न्यूज

Goa Viral Video: पालकांचा निष्काळजीपणा! चालू गाडीच्या छतावर चिमुकल्यांची झोप; धक्कादायक VIDEO व्हायरल

Tourist in Goa drives XUV with kids sleeping on its roof: लहान मुले असे काही करत आहेत, याबद्दल मात्र त्याच्या पालकांना माहितीही नाही. पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाने गाडी थांबवून याची माहिती त्या कार चालकाला दिली.

Gangappa Pujari

Goa SUV Viral Video:

सध्या लहान मुलांमध्येंही चारचाकी गाड्यांंमधून फिरण्याची, सनरुफ घेण्याची प्रचंड क्रेझ आहे. चार चाकीमधून फिरताना अनेकदा लहान मुले सनरुफचा आनंद घेत असतात. मात्र अनेकदा अशा प्रकारे लहान मुलांनी सनरुफ घेणे धोकादायकही ठरु शकते. सोशल मीडियावर सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचे (New Year Celibration) स्वागत करण्यासाठी अनेकजण पर्यटनासाठी घराबाहेर पडलेत. नव वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकांनी गोव्याला (Goa Trip) जाण्याचाही प्लॅन केला आहे. गोव्याला फिरण्यासाठी आलेल्या अशाच एका कुटुंबाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ही फॅमिली गोव्यामध्ये फिरताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडीतील चिमुकल्यांनी सनरुफमधून बाहेर पडत गाडीच्या टपावर झोपल्याचे दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची ये- जा सुरू असतानाच मुले शांतपणे टपावर झोपी गेली आहेत. लहान मुले असे काही करत आहेत, याबद्दल मात्र त्याच्या पालकांना माहितीही नाही. पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाने गाडी थांबवून याची माहिती त्या कार चालकाला दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या जवाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी असा निष्काळजीपणा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो असे म्हणत कार चालकाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याबद्दल अनेकांनी देवाचे आभारही मानले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT