New Year Celebration : थर्टी फर्स्टसाठी 'या' ठिकाणी जात असाल तर जरा थांबा; पार्टीच्या रंगाचा होईल बेरंग

31st celebration places : ३१ डिसेंबरपर्यंत अनेक गडकिल्ल्यावंर थांबण्यास स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. बंदी झुगारुन पर्यटकांनी तिथे थांबण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कारवाईचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.
New Year Celebration
New Year CelebrationSaam TV
Published On

New Year Celebration :

थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांना आपले प्लान तयार केले असतील. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पार्टी करण्याचा चंग अनेकांना बांधला असेल. मात्र तुमच्या पार्टी मूडच्या रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांची माहिती असणे आवश्यक आहे.

गड किल्ल्यावर जाऊन मजा-मस्ती करण्याचं तुम्ही ठरवलं असेल तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. कारण ३१ डिसेंबरपर्यंत अनेक गडकिल्ल्यावंर थांबण्यास स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. बंदी झुगारुन पर्यटकांनी तिथे थांबण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कारवाईचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

New Year Celebration
New Year Travel : डोंगराळ भागात फिरण्याचा प्लान करताय? हॉटेल बुक करताना या ४ चुका करु नका, पैसे जातील पाण्यात

पुणे

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील गड, किल्ले, टेकड्यांवर, शहरालगतच्या वनक्षेत्रात, अभयारण्यामध्ये पार्टी करण्यावर वनविभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. तीन दिवसाच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांकडून अपेक्षित गोंधळ लक्षात घेऊन वनविभागाने गड किल्ल्याच्या पायथ्याला संरक्षित क्षेत्रात मुक्काम करणाऱ्या, तंबू टाकून सेलिब्रेशन करण्यास बंदी जाहीर केली आहे.

सातारा

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील वासोटा किल्ला, कोयना आणि नवजा या ठिकाणी ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यत पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. या दुर्गम आणि वन्य भागात वासोटा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून हौशी पर्यटक ट्रेकिंगसाठी येत असतात.

या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे या वासोट्या किल्ल्यावरील वन्यप्राण्यांना धोका पोहचू शकतो. यासाठी वनविभागाच्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाने वासोटा किल्ल्यावर येण्यास बंदी घातली आहे. नववर्षाच्या स्वागताला होणारी हुल्लडबाजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

New Year Celebration
New Year Party 2024 : हाऊस पार्टीचा प्लान करताय? घरच्या घरी झटपट बनणाऱ्या Snacks ची लिस्ट एकदा पाहाच

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई अभयारण्य परिसरात रात्री गड किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा धरण परिसरात असलेल्या गड किल्ल्यावर ३० आणि ३१ तारखेला मुक्काम करता येणार नाही. कळसूबाई अभयारण्यातील कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदण व्हॅली यासह अनेक ठिकाणी वन क्षेत्रात पर्यटक मुक्काम करून नववर्षाचे स्वागत करत असतात. पर्यटक दिवसा या ठिकाणांना भेट देऊ शकणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com