New Year Travel : डोंगराळ भागात फिरण्याचा प्लान करताय? हॉटेल बुक करताना या ४ चुका करु नका, पैसे जातील पाण्यात

Travel Plan : तुम्ही देखील घरापासून लांब रोड ट्रिप किंवा डोंगराळ भाग फिरण्याचा प्लान केला असेल तर या चुका करु नका. अनेकदा आपण फिरायला जाण्यापूर्वी पूर्वतयारी करतो. अशावेळी आपण काय खबरदारी घ्यायला हवी हे पाहूया.
New Year Travel
New Year TravelSaam Tv
Published On

Do Not Make These 4 Mistake While Booking Hotel :

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण फिरण्याचा प्लान करतात. त्यासाठी आधीच बुकिंग देखील केलेली असते. जुन्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण अनेक फिरण्याचे प्लान करतो.

जर तुम्ही देखील घरापासून लांब रोड ट्रिप किंवा डोंगराळ भाग फिरण्याचा (Travel) प्लान केला असेल तर या चुका करु नका. अनेकदा आपण फिरायला जाण्यापूर्वी पूर्वतयारी करतो. अशावेळी आपण काय खबरदारी घ्यायला हवी हे पाहूया. डोंगराळ भागात ट्रिपचा प्लान केला असेल तर वातावरणातील बदल, थंड वारा आणि बर्फवृष्टी असते त्यामुळे हॉटेल बुक करताना काय करायला हवे हे जाणून घेऊया.

1. वेळेवर बुकिंग करा

बरेचदा आपण अचानक फिरण्याचा प्लान करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक हॉटेल्स हे आधीपासून बुक असतात. जर तुम्ही आयत्यावेळी बुकिंग (booking) केल्यास खोल्यांचे दरही वाढू शकता. किमान महिना किंवा आठवड्याभरापूर्वी बुकिंग करायला हवी.

New Year Travel
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राममंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी जाताय? स्वस्तात मस्त बुक करा हॉटेल, पाहा लिस्ट

2. बजेटनुसार हॉटेल निवडा

डोंगराळभागात हॉटेलच्या किमती (Price) या बदलत असतात. त्यासाठी हॉटेल बुक करण्यापूर्वी त्याच्या सुविधा आणि किमतीची तुलना करा. काही हॉटेलमध्ये खोल्यांची किमती खूप जास्त असते. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार हॉटेल आणि रुम निवडू शकता.

3. हॉटेलच्या सुविधांकडे लक्ष द्या

डोंगराळभागात जाण्यासाठी हॉटेलचे बुकिंग करताना त्यातील सुविधांकडे लक्ष द्या. हॉटेलमधील स्विमिंग पूल, जिम, रेस्टारंट, बार आदी सुविधांची माहिती घ्या. तिथे राहाण्यापूर्वी ते हॉटेल किती सुरक्षित आहे हे देखील तपासा. रुम, स्नानगृह आणि जेवणाच्या संबंधित माहिती घ्या.

New Year Travel
Winter Travel Place : हिवाळ्यात नॉर्थ इंडियामध्ये फिरायचे आहे? ही पर्यटनस्थळे आहेत निसर्गरम्य

4. हॉटेलच्या जवळपासच्या सुविधा

बरेचदा हॉटेल बुक करताना तेथील दुकाने खूप दूर असतात. हॉटेल बुक करण्यापूर्वी त्याच्या जवळपास मार्केट आहे की, नाही ते पाहा. तसेच जवळपास रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत का हे देखील तपासा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com