Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राममंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी जाताय? स्वस्तात मस्त बुक करा हॉटेल, पाहा लिस्ट

Cheapest Hotel List In Ayodhya : जर तुम्हाला प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायचे असेल तर आतापासूनच हॉटेल्स ते गेस्ट हाऊस बजेटमध्ये बुक करु शकता. २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडेल.
 Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaam Tv
Published On

Budget Friendly Hotel In Ayodhya :

अयोध्येत तयार होत असणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडेल.

अशावेळी जर तुम्हाला प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायचे असेल तर आतापासूनच हॉटेल्स ते गेस्ट हाऊस बजेटमध्ये (Budget) बुक करु शकता. परंतु, या काळात सर्वसामान्यांना एन्ट्री मिळणार नाहीये. पण हा सोहळा पार पडल्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्याचे असेल तर हे बजेट फ्रेंडली हॉटेल (Hotel) बुक करु शकता.

1. गुजराती धर्मशाळा

अयोध्या रेल्वे स्थानकाजवळ गुजराती धर्मशाळेत १०० ते १००० रुपयांपर्यंत रुम बुक करता येऊ शकते. याशिवाय जेवणही फ्रीमध्ये मिळेल. कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला सिंगल बेड आणि रुमही मिळेल. ही धर्मशाळा रेल्वे स्टेशनच्या अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर आहे.

 Ayodhya Ram Mandir
Winter Travel Place : हिवाळ्यात नॉर्थ इंडियामध्ये फिरायचे आहे? ही पर्यटनस्थळे आहेत निसर्गरम्य

2. श्री सीता राजमहल धर्मशाळा

श्री सीता राजमहल धर्मशाळेत डबल बेड एसी रुमची किंमत १२०० रुपये आणि नॉन एसी रुमची किंमत (price) ६०० रुपये आहे. येथे तुम्हाला ७० रुपयांची थाळी मिळू शकते. तुम्ही कमी खर्चात येथे भेट देऊ शकता.

3. मानस भवन

बजेटनुसार स्वस्त हॉटेल शोधत असाल तर मानस भवन तुमच्यासाठी योग्य असेल. येथे तुम्हाला एसी आणि नॉन एसी दोन्ही प्रकारच्या रुम मिळतील. येथे ७०० ते १००० रुपयांमध्ये तुम्हाला रुम मिळेल. यामध्ये साधारणत: तीन लोक राहू शकता. तसेच १५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत थाळीची चव चाखायला मिळते.

 Ayodhya Ram Mandir
Winter Travel Trip : गुलाबी थंडीचा लुटा आनंद, ५००० रुपयात फिरा भारतातील ही ठिकाणं

4. कनक भवन

कनक भवन हे अयोध्येतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथे मंदिराच्या जवळ भाविकांची राहाण्याची व खाण्याची उत्तम सोय केली आहे. येथे तुम्हाला ३०० ते ५०० रुपयांमध्ये रुम बुक करता येईल. येथे भंडारा फ्रीमध्ये मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com