National Politics News: जगदीप धनखड यांनी 'आप'ला दिला दणका, राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते स्वीकारण्यास दिला नकार

Raghav Chadha News: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याची आपची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.
Jagdeep dhankhar & Raghav Chadha
Jagdeep dhankhar & Raghav ChadhaSaam Tv
Published On

Jagdeep Dhankhar Refuses AAP Request To Appoint Raghav Chadha Rajya Sabha Leader:

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याचे आपची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.

संजय सिंह यांच्या जागी आपने खासदार राघव यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती केली होती. राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, आप पक्षाने म्हटले आहे की, संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चढ्ढा यापुढे वरच्या सभागृहात पक्षाचे नेते असतील. मात्र धनखड यांनी हे मान्य करण्यास नकार दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jagdeep dhankhar & Raghav Chadha
Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाने मविआ जागावाटपाचं गणित बिघडलं; 31 डिसेंबरला होणार फैसला

दिल्ली दारू धोरण प्रकरणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी सांगितले की, चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत आपकडून पत्र प्राप्त झाले आहे. यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्यसभेच्या सरचिटणीसांना पत्र पाठवले होते. (Latest Marathi News)

राघव चढ्ढा हे राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक असल्याची माहिती आहे. सध्या आपचे राज्यसभेत एकूण 10 सदस्य आहेत. भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर राज्यसभेतील सदस्यसंख्येच्या बाबतीत आप हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे.

Jagdeep dhankhar & Raghav Chadha
OBC Reservation: मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचाही सरकारला इशारा; मुंबईत आंदोलनासाठी मागितली परवानगी, सरकार काय निर्णय घेणार?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शैक्षणिक पदवीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अहमदाबादच्या मेट्रोपॉलिटन कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एसजे पांचाल यांच्या कोर्टाने सिंह यांच्या विरोधात हा वॉरंट जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com