Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाने मविआ जागावाटपाचं गणित बिघडलं; 31 डिसेंबरला होणार फैसला

Prakash Ambedkar Mahavikas Aghadi: प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक ३१ डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSaam Tv
Published On

प्रमोद जगताप

Prakash Ambedkar Maha Vikas Aghadi:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारीपक्षासहित विरोधी पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत १२ जागांचा प्रस्ताव 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे पाठवला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक ३१ डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल उद्धव ठाकरे , शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवलं. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 12+12+12+12 जागेचा फॉर्म्युलाच्या प्रस्ताव पाठवला.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Aghadi
OBC Reservation: मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचाही सरकारला इशारा; मुंबईत आंदोलनासाठी मागितली परवानगी, सरकार काय निर्णय घेणार?

तिन्ही पक्ष एकत्र घेणार चर्चा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या १२ जागांच्या प्रस्तावानंतर ३१ डिसेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत.

या बैठकीत 'वंचित'ला महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. मुंबईत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mahavikas Aghadi
Raigad News: देवेंद्र फडणवीसांचा एक मेसेज, सुत्रे हलली अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ पर्यटक सुखरुप सुटले

उद्धव ठाकरेंची लोकसभेच्या जागावाटपासाठी दिल्लीवारी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक होणार आहे. लोकसभा जागावाटप संदर्भात काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करणार आहे. उद्धव ठाकरेंची ही चर्चा २ किंवा ३ जानेवारी रोजी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com