सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका लग्नातील व्हिडिओ माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे भर लग्नातचं मंडपात नवरा- नवरीची झालेली मारामारी. भर लग्नात नवरदेवाची नवरीने केलेली फजिती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊ.
लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.
कधी नवरा- नवरीच्या जबरदस्त एन्ट्रीची, कधी डान्सची, तर कधी पाहुण्यांमध्ये जुंपलेल्या भांडणांची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते. मात्र लग्नात नवरा- नवरीमध्येच जुंपल्याचे तुम्ही कधीच पाहिले नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरीने नवरदेवालाच अद्दल घडवल्याचे दिसत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, मंडपात विवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे. नवरा- नवरी बसल्याचे दिसत असून विवाह सोहळा अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच नवरदेव नवरीच्या समोर आल्यानंतर तिला दारुचा वास येतो. लग्न सोहळ्यात दारु पिऊन नवरदेवाने एन्ट्री केल्याने नवरीचा राग अनावर होतो अन् ती थेट त्याच्या कानशिलात लगावते.
नवरीचा हा अवतार पाहून पाहुणे मंडळीही चांगलीच घाबरुन गेली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी या नवरीचे कौतुक केले आहे, तर काही जणांनी नवरदेवाच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.