Viral Video: आधी बाह्या वर केल्या, मग बॅट हाती घेतली... आमदार महोदय क्रिकेटच्या पिचवर उतरले अन् तोंडावर आपटले

Viral News: क्रिकेटच्या मैदानावरचा ओडिशातील एका आमदाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरले पण तोल जाऊन पडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Odisha Cricket Viral Video
Odisha Cricket Viral VideoSaam Tv
Published On

Odisha Cricket Viral Video:

भारतात सर्वात जास्त क्रिकेट हा खेळ खेळला जातो. देशात अगदी गल्ली क्रिकेट ते आयपीएल अशा सर्व मॅच होतात. अगदी सामान्य व्यक्ती, कलाकार ते नेते मंडळी सर्वच क्रिकेट खेळतात. असाच ओडिशातील आमदार मोह भूपेंद्र सिंह यांना आवरला नाही. ते क्रिकेट खेळायला मैदानावर उतरले पण बॅट जोराने फिरवताना त्यांचा तोल गेला आणि खाली पडले. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest News)

ओडिशाच्या नार्ला मतदारसंघाचे आमदार भूपेंद्र सिंह हे कालाहांडी येथे एका क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः बॅट हातात घेतली आणि खेळायला सुरुवात केली. तरुण मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी बॅटिंग केली.

बॅटिंग करताना पहिल्याच बॉलला त्यांनी लांबचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न फोल गेला आणि त्यांचा तोल गेला. भूपेंद्र सिंह जमिनीवर जोरात पडले. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Odisha Cricket Viral Video
Viral Video: 70 वर्षांच्या शांताबाईचा जबरदस्त कॅटवॉक; आजीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडल्या

व्हायरल व्हिडिओत भूपेंद्र सिंह यांचा खेळ पाहण्यासाठी खूप लोक उपस्थित असल्याचे दिसत आहे. सर्वजण खेळ पाहत असतात. भूपेंद्र सिंह शॉट मारतात आणि जोरात जमिनीवर पडतात. त्यावेळी आजूबाजूचे सर्व लोक त्यांना मदत करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार भूपेंद्र सिंह यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Odisha Cricket Viral Video
Parle G Girl Replaced: पार्ले गर्ल झाली गायब...पार्ले बिस्किटच्या पॅकेटला मिळालाय नवीन चेहरा; पहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com