pune petrol pump  Saam tv
व्हायरल न्यूज

Pune Shocking : सीएनजी भरताना निष्काळजीपणा केला, कर्मचाऱ्यांनं डोळा गमावला; नेमकं काय घडलं? VIDEO

pune cng petrol pump accident : तुम्ही तुमच्या वाहनांमध्ये सीएनजी गॅस भरत असाल तर काळजी घ्या...कारण पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना घडली आहे. एका छोट्या चुकीमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागलाय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्यानं सीएनजी वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र गेल्या काही काळातील सीएनजी पंपावरच्या दुर्घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीती पसरलीय. कारण सीएनजी गॅस भरताना कुठे कारमध्ये स्फोट झालाय. तर कुठे रिक्षामध्ये स्फोट होऊन नागरिक जखमी झालेत. आता या भीतीत आणखी भर घालणारी धक्कादायक घटना पुण्यातल्या एका सीएनजी पंपावर घडलीय. एका छोट्या चुकीमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागला आहे.. विचलीत करणारी ही धक्कादायक दृश्य सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहेत.

नक्की कशामुळे दुर्घटना घडली ते पाहूया...पुणे शहरातील धनकवडी भागात ही घटना घडली. तीन हत्ती चौकातल्या एस स्क्वेअर सीएनजी पंपावर हर्षद गेहलोत हा कर्मचारी नेहमीप्रमाणे दुचाकीमध्ये सीएनजी गॅस भरत होता. त्याने सीएनजीचं नोझल दुचाकीला लावलं आणि गॅस सुरु केला. मात्र तेवढ्यात अचानक अत्यंत वेगाने सीएनजीचं नोझल उडालं आणि हर्षदच्या चेहऱ्यावर आदळलं. तो जमिनीवर धाडकन कोसळला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेनं पंपावरचे सगळेच सैरावैरा पळाले. हर्षदला त्याचा डोळा गमवावा लागलाय. या प्रकरणात पंप मालक धैर्यशील पानसरे आणि रोहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनांमध्ये सीएनजी भरताना काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया...

सीएनजी भरताना काळजी घ्या

- सीएनजी हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे

- गॅस भरताना वाहनामध्ये बसू नका

- इंधन भरताना इग्निशन बंद करा

- सीएनजी टाकी जास्त भरणे टाळा, गळतीचा धोका असतो

- उन्हाळ्यात सिलेंडर क्षमतेच्या दोन-तृतीयांश पर्यंतच भरा

- टाकी रिकामी होईपर्यंत गाडी चालवू नका

- CNG रिफिल करताना मोबाईल वापरणे टाळा

सीएनजी पंपावर वाहनधारकांनी ही काळजी घेतलीच पाहिजे. मात्र पंपावरील कर्मचाऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन त्यांनी केले पाहिजे. पंपचालकांनी कर्मचाऱ्यांना सेफ्टी कीट देणे गरजेचे झाले आहे. पंपावर वाहनांची रांग असते. अशावेळी कर्मचाऱ्यांनीही घाईगडबड न करता शांतपणे काम करणे गरजेचे आहे. अन्यथा थोडाही निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT