Jalgaon Illegal Gas Refilling : घरातच सुरू होते अवैध गॅस रिफिलिंग सेंटर; पोलिसांची छापा टाकत कारवाई, ३४ सिलेंडर जप्त

Jalgaon News : जळगाव शहराच्या अजिंठा चौफुलीजवळ मागील महिन्यात अशाच प्रकारे कारमध्ये गॅस भरणा करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : जळगाव शहरात अवैध गॅसचा वापर होत असल्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. कारमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांची या अवैध गॅस भरणा केंद्रांवर नजर आहे. यातच जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात घरातच अवैध गॅस रिफिलिंग सेंटर चालविले जात असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी कारवाई केली आहे. 

घरगुती व व्यावसायिक सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासाठी सिलेंडरचे ब्लॅक मार्केट चालविणारे रॅकेट देखील आहे. दरम्यान कारमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे भरणा करून देणारे काही ठिकाण जळगाव शहरात तयार झाले आहेत. यातच जळगाव शहराच्या अजिंठा चौफुलीजवळ मागील महिन्यात अशाच प्रकारे कारमध्ये गॅस भरणा करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अवैध गॅस वापराचा मुद्दा समोर आला आहे. 

Jalgaon News
Shocking News : भयंकर! शर्टाने घात केला; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू

यानंतर पोलिसांनी अवैध गॅस वापर करण्यावर करडी नजर आहे. अशातच जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Jalgaon News
आजच्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शफी याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com