Shocking News : भयंकर! शर्टाने घात केला; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू

Mumbai Shocking News : दादरमध्ये मशीनमध्ये एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दादर प्रभादेवी परिसरात खळबळ उडाली आहे.
Shocking News : भयंकर! शर्टाने घात केला; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू
Mumbai dadarDadar Shocking News
Published On

सचिन गाड, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या दादरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी रात्री चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तरुण मजुराचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. मजूर मशीनमध्ये अडकल्यानंतर कारखान्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दादरमध्ये एका मशीनमध्ये अडकून २२ वर्षीय मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून या २२ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला आहे. सूरज यादव असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Shocking News : भयंकर! शर्टाने घात केला; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू
Crime News : बापरे! समृद्धी महामार्गावर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त

नेमकं काय घडलं?

दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागात चायनीज बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यात चायनीज बनवण्यासाठी मशीन आहेत. या चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून २२ वर्षीय सूरज यादव नावाच्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरजचा शर्ट मशीनमध्ये अडकल्याने आत खेचला गेल्याची माहिती आहे.

Shocking News : भयंकर! शर्टाने घात केला; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू
Crime News : ब्लॅकमेल करून मुंबईत लैंगिक अत्याचार, पुरावे नष्ट करण्यासाठी बोलावून संभाजीनगरमध्ये पुन्हा अत्याचार, धर्मांतराचाही प्रयत्न

या मशीनमध्ये अडकून सूरजचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणत्याही गुन्हा दाखल केलेला नाही. हा मजूर नेमका कुठे राहतो, घटनास्थळी किती कर्मचारी उपस्थित होते, याचीही माहिती हाती आलेली नाही.

Shocking News : भयंकर! शर्टाने घात केला; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू
Crime News : सख्खा भाऊ, पक्का वैरी! किरकोळ वादातून छोट्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com