AC Local Video: एसी लोकलच्या लेडीज डब्यात मनोरुग्ण नग्नावस्थेत चढला; VIDEO VIRAL

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एक मनोरुग्ण नग्न अवस्थेत ट्रेनच्या महिला डब्यात चढला आहे. हा व्यक्ती ट्रेनमध्ये चढल्यावर महिलांना आरडा-ओरडा केला.
VIDEO
VIDEO Saam Tv
Published On

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ असतात. मुंबई लोकलमधील हाणामारीचे, महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. परंतु सध्या सोशल मीडियावर संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Train Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओत एक मनोरुग्ण एसी लोकलच्या लेडीज डब्यात नग्न अवस्थेत चढला आहे. मनोरुग्ण अचानक लेडीज डब्ब्यात आल्याने महिलांना खूप भीती वाटली. लेडीज डब्ब्यात खूप आरडाओरडा झाला. (Viral News)

VIDEO
Viral Video: आता काय म्हणावं! भरररस्त्यात काकांचा बाईकस्टंट; VIDEO पाहून नेटकरी हैराण

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ घाटकोपर रेल्वे स्थानकावरचा आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर एसी लोकल थांबलेली तेव्हा हा मनोरुग्ण नग्न अवस्थेत चढला.सोमवारी दुपारी १६ डिसेंबर २०२४ ही घटना घडली. चार वाजून अकरा मिनिटांनी कल्याण एसी लोक घाटकोपर स्थानकावर थांबली. ट्रेन स्टेशनवर आल्यावर लगेचच हा मनोरुग्ण या डब्यात चढला. हा व्यक्ती लोकलमध्ये चढताच खूप आरडाओरडा झाला. मात्र, त्याला वाचवायला कोणीच आले नाही.

VIDEO
Viral Video: पठ्ठ्याने चहाप्रेमींसाठी बनवला हटके जुगाड; बाईकचा वापर करुन बनवले चहा एटीएम; पाहा VIDEO

दरम्यान, मोटरमॅनने लोकल थांबवली. त्यावेळी बाजूच्या डब्यात टीसी होता. टीसीने मनोरुग्णाला बाहेर काढले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. अचानक महिलांच्या डब्यात हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन काय करणार असे प्रश्न विचारले जात आहेत.

VIDEO
Viral Video: काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग! पेट्रोल पंपावर गॅस भरायला गेला अन् डोळा गमावला, पुण्यातील धक्कादायक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com