
पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहावून प्रवास करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेने काही निवडक लोकल सेवांच्या वेळेत आणि थांब्यामध्ये बदल केले आहेत. सोमवारपासून केलेले हे बदल तात्पुरते असतील.
पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, लोकल ट्रेन क्रमांक 92019 अंधेरी-विरार (सकाळी 6:49) फक्त भाईंदर येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 90648 नालासोपारा (सायंकाळी ४.०८ वाजता) येथून सुटण्याऐवजी ती भाईंदर स्टेशनवरून सायंकाळी ४.२४ वाजता रवाना होईल. ट्रेन क्रमांक 90208 भाईंदर-चर्चगेट (सकाळी 8 वाजता) आणि 90249 चर्चगेट-नालासोपारा (सकाळी 9:30 वाजता) या लोकलला आता 12 डब्यांच्या ऐवजी 15 डबे असतील. या लोकल आता चर्चगेट ते मुंबई सेंट्रलपर्यंत जलद असतील.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच आणखी एक एसी लोकलसेवा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 12 सामान्य लोकलसेवा काढून टाकाव्या लागल्या. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा प्रवाशांनी विरोध केला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून या निर्णयाचा निषेध करण्यात आला असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत. संतप्त प्रवाशांना शांत करण्यासाठी रेल्वेने हे बदल केल्याचे बोलले जात असून यामध्ये भाईंदर रेल्वे स्थानाकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
16 डिसेंबर म्हणजे सोमवारपासून लागू झालेल्या बदलांमुळे पश्चिम रेल्वे स्थानकांवरील इंडिकेटर्समध्ये गडबड झाल्याचे पाहायला मिळाले. चर्नी रोड स्थानकावरील एका प्रवाशाने सांगितले की, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील इंडिकेटरने सकाळी 11:57 ची गोरेगाव लोकल दाखवली. पण ही लोकल 12:22 आहे. इंडिकेटरमधील या त्रुटींमुळे प्रवाशांना दिवसभर अडचणींचा सामना करावा लागला.
दादर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाने सांगितले की, इंडिकेटर पाहून त्यांनी एसी लोकलचे तिकीट काढले पण नंतर कळले की ट्रेन आधीच निघून गेली आहे. रेल्वे या तिकिटासाठी कोणतीही भरपाईही देत नाही, अशा स्थितीत एसी लोकलच्या प्रवाशांना प्रोत्साहन कसे मिळणार, ते तिकीट का खरेदी करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.