०६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. यानिमित्त होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध २ ते ९ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

खालील स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल:
-मुंबई विभाग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण
-भुसावळ विभाग: बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक
-नागपूर विभाग: नागपूर आणि वर्धा
-पुणे विभाग: पुणे
-सोलापूर विभाग: सोलापूर
सवलत:-
प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना केल्या जातील. ५ आणि ६ डिसेंबर रोजी स्टेशन परिसर नियमित रेल्वे प्रवासी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गजबजलेला असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.